हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक या भारतातील आघाडीच्या आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादाराने आपल्या भारतातील व्यवसायाची २५ वष्रे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने कंपनीने २०१७ पर्यंत ६०० कोटी रुपयांच्या व्यवसाय वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक ही आघाडीची आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादार म्हणून गणली जाते. कंपनीचे संपूर्ण भारतात अस्तित्व असून १६ शाखा व १८० पेक्षा अधिक सेवा स्थाने आहेत.
भारतातील वाटचालीबद्दल हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक तरुण सेठ म्हणाले की, भारतासारख्या अत्यंत स्पर्धात्मक आयटी बाजारपेठेत वाटचाल करणाऱ्या या कंपनीने ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार उच्च मूल्य उपाययोजना आणि सेवा देऊन संपूर्ण भारतात अस्तित्व प्रस्थापित केले आहे.
हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक्स विविध उद्योगांच्या उत्पादनांसाठी वैविध्यपूर्ण आयटी आवश्यकतांवर काम करत असून त्यात सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना, बीएफएसआय, आयटी/आयटीईएस, उत्पादन, रिटेल, ऑनलाईन, मीडिया, आदरातिथ्य/आरोग्यसेवा, ऑटोमोबाइल्स, प्रवास आणि लॉजिस्टिक्स यांचा समावेश आहे.