02 April 2020

News Flash

होंडाकडून ९०,२१० वाहने माघारी

इंधन नळी बदलून देण्यासाठी होंडाने वाहन माघार योजना सादर केली आहे.

इंधन नळी बदलून देण्यासाठी होंडाने वाहन माघार योजना सादर केली आहे. कंपनीच्या डिझेलवर चालणाऱ्या व डिसेंबर २०१३ ते जुलै २०१५ दरम्यान तयार करण्यात आलेल्या ९०,२१० सिटी व मोबिलिओ वाहने माघारी बोलाविण्यात आली आहेत. यामध्ये ६४,४२८ या सेदान श्रेणीतील होंडा सिटी व २५,७८३ मोबिलिओ या बहुपयोगी वाहनांचा समावेश आहे. सदोष एअरबॅगबाबतही कंपनीने यापूर्वी २.२४ लाख वाहने माघारी घेतली होती. वाहन क्षेत्रातील ऐतिहासिक वाहन माघार जर्मनीच्या फोक्सव्ॉगनने ३.२३ लाख वाहनांच्या रूपात नोंदविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 12:23 am

Web Title: honda take back cars from market
टॅग Honda
Next Stories
1 डिजिटल पद्धतींचा अंगीकार करणाऱ्या नवउद्यमींनाच ग्राहक पाठबळ
2 काळा पैसा देशाबाहेर धाडणारी भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था
3 काळा पैसा खणून काढण्याचा सरकारचा व्यूह ‘हास्यास्पद’
Just Now!
X