जपानची होन्हाही आता हीरोला स्पर्धा देण्यासाठी सज्ज झाली आहे. होन्डाने तिच्या स्कूटर सेगमेन्टमधील लोकप्रिय अ‍ॅक्टिव्हा, डिओ आणि एव्हिएटरचे नवे रुप सादर केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वर्मा, वितरक दालनाचे सरव्यवस्थापक एस. सुरेंद्र बाबु आणि विक्री प्रमुख हेमाकुमार हे यावेळी हैदराबादेत उपस्थित होते. नव्या तंत्रज्ञानासह अद्ययावत करण्यात आलेल्या या तीनही स्कूटरच्या किंमती मात्र सध्याच्या स्तरावर स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.११० सीसी इंजिन क्षमतेच्या या वाहनांद्वारे १० ते २० टक्के अधिक इंधन क्षमता प्रदान केली जाते.
कट्टर स्पर्धा!
होन्डापासून फारकत घेणाऱ्या हीरोने (आता हीरो मोटोकॉर्प) आता आपले लक्ष्य विदेशावर केंद्रीत केले आहे. कंपनी सध्या आपला पूर्वीचा भागीदार होन्डा तसेच मुळची भारतीय कंपनी बजाज मोटरसायकलचा तीव्र सामना करावा लागत आहे. कंपनीची मासिक वाहन विक्रीही गेल्या काही कालावधीत रुंदावली आहे. त्यात यंदा होन्डासह, सुझुकी यांनी वरचढ राहण्याचा प्रयत्न केला आहे. हीरोच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल दुवा यांनी नवी दिल्लीत सोमवारी कंपनी आपली वाहन उत्पादने लॅटिन अमेरिका, आफ्रिकेसारख्या नव्या ८ ते १० देशांमध्ये मार्चपर्यंत निर्यात करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. याद्वारे कंपनी २०१६-१७ पर्यंत १० लाख हीरो वाहने भारताबाहेर पाठवेल. विशेष म्हणजे याच अमेरिकादी देशांमध्ये सद्या होन्डासह यामाहा, सुझुकी आणि कावासाकीसारख्या जपानी कंपन्यांचा वरचष्मा आहे. कंपनीने गेल्याच सप्टेंबरमध्ये शेजारच्या श्रीलंका आणि नेपाळ देशांमध्ये आपला हीरो ब्रॅण्ड सादर केला होता. विदेशात अधिक निर्यातीवर भर देण्यामध्ये सध्या बजाज आघाडीवर आहे.