News Flash

रुपयाच्या सातत्याने घसरणीमुळे तुम्हाला काय फटका बसणार?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणाऱया घसरणीचे फटके येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

| August 19, 2013 10:39 am

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणाऱया घसरणीचे फटके येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. सोमवारी पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कोसळला. एका डॉलरचा भाव ६२.३५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. याआधी गेल्या आठवड्याच्या शेवटी डॉलरचा भाव ६१.६५ला बंद झाला होता. 
भारतामध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या आणि सेवांच्या निर्यातीपेक्षा आयात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच रुपयाची सातत्याने घसरण होत असल्यामुळे परदेशातून आयात होणाऱया वस्तूंवर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचा फटका केवळ आयात-निर्यातीचा व्यवसाय करणारे किंवा श्रीमंतानाच बसणार नसून, सामान्यांचीही यामध्ये ससेहोलपट होण्याची शक्यता आहे. एकीकडे महागाईचा दरही दर आठवड्याला वाढत असताना घसरत्या रुपयामुळे त्याचा आलेख आणखी चढताच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयामुळे काय होऊ शकते…
– कच्च्या तेलासाठी अधिक रुपये मोजावे लागणार
– खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता
– डाळींचे भावही वाढण्याची शक्यता
– कोळसा, खते यांच्या किंमती वाढतील
– औषधे महागण्याची शक्यता
– पेट्रोल आणि डिझेलची दर वाढण्याची शक्यता
– वाढता उत्पादन खर्च सहन करण्यासाठी कंपन्यांना मनुष्यबळात कपात करावी लागण्याची किंवा पगारकपात करावी लागण्याची शक्यता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 10:39 am

Web Title: how a falling rupee can hit costs pay jobs
Next Stories
1 सेन्सेक्स ७७० अंश घसरणीने घायाळ!
2 रिझव्‍‌र्ह बँकेला वाकुल्या..रुपयाचा नवा नीचांक
3 सोने तोळ्यासाठी पुन्हा ३० हजारापल्याड
Just Now!
X