29 September 2020

News Flash

म्युच्युअल फंडांची निवड करताना टाळता येणारी चुकांची पुनरावृत्ती

बाजारात घसरण होण्याची वाट पाहात बसणे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बाजारात घसरण होण्याची वाट पाहात बसणे :

बाजार निर्देशांक एका पातळीवर असतांना गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक करण्यास कचरतात. अशा कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांना बाजार नजीकच्या काळात घसरेल आणि घसरलेल्या बाजारात मी नवीन गुंतवणूक करेन असे सारखे वाटते. प्रत्यक्षात गुंतवणूकदार एका मोठय़ा तेजीला मुकत असतो. आजपर्यंतचा असा नुभव आहे की बाजारात गुंतवणुकीचा कोणीच मौका साधू शकलेले नाही. बाजारात गुंतवणुकीची वेळ साधण्याचे उत्तम धोरण म्हणजे एसआयपी किंवा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे. बाजारातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी एसआयपी सारखे दुसरे प्रभावी नाही. एसआयपी केवळ गुंतवणुकीची संधी साधण्यासाठी नसून गुंतवणूक करण्याचा एस शिस्तबद्ध मार्ग आहे.

गुंतवणुकीत मोठय़ा संख्येने फंडाचा अंतर्भाव करणे :

अनेकांचा असा समज असतो की गुंतवणुकीत मोठय़ा संख्येने फंडाचा अंतर्भाव केल्यास गुंतवणुकीची जोखीम कमी करता येते. परंतु हा मोठा गैरसमाज आहे. गुंतवणुकीत जितके फंड अधिक तितके परताव्याचा दर कमी. तुमच्या गुंतवणुकीतसाठी योग्य फंडाची निवड करून दीर्घ काळ या फंडात गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळविण्याचा राजमार्ग आहे. गुंतवणुकीची रक्कम आणि गुंतवणुकीची मागची उद्दिष्टांचा विचार करून गुंतवणुकीत ६ ते८ पेक्षा अधिक फंड असू नये.

फंडाची कामगिरी घसरल्यानंतर फंडातून गुंतवणूक काढून घेणे किंवा मंदीत गुंतवणूक काढून घेणे :

गुंतवणुकीचा निर्णय हा भय आणि हाव या दोन भावनांवर घेतला जातो. खालच्या भावात खरेदी आणि वरच्या भावात हे सूत्र आचरणात आणायला वाटते तितके सोपे नाही. घसरलेल्या बाजारात खरेदीची संधी असते असे म्हटले तरी त्या वेळेला तुमच्याकडे रोकड सुलभता असेलच असे नाही. असा कुठलाही फंड नाही ज्याने घसरण अनुभवली नसेल. घसरणी मागची कारणांची मीमांसा करणे योग्य ठरेल. जर तुमची योग्य फंडाची निवड असेल तर तात्पुरत्या फंडाच्या अप्क्षेपेक्षा कमी कामगिरीचे काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

नजीकच्या काळाच्या परताव्याच्या दारावर फंडाची निवड करणे :

बहुतांश वेळा गुंतवणूकदारांकडून घडणारी चूक म्हणजे नजीकच्या काळातील ६ महिने किंवा १ वर्षांचा परताव्याचा दर पाहून फंडाची दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निवड करणे. निव्वळ कोष्टक पाहून फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. कोष्टके, अव्वल परतावा असणारा फंडाची भूतकाळातील कामगिरी दर्वीत असतांत. गुंतवणूक दरांनी आपली जोखीम सहन करण्याची क्षमता जाणून घेणे गरजेचे असते. जसे की, २०१६ मध्ये स्मॉलकॅप फंडांनी भरघोस परतावा दिला. परंतु २०१७ मध्ये बाजार वेगाने चढउतारांना समोर जात असतांना स्मॉलकॅप फंडांच्या एनएव्हीत होणारे चढ उतार सहन करू शकाल काय हा प्रश्न आपल्या मनाला विचारणे गरजेचे आहे. एखाद्या विशिष्ठ काळात फंडाचा परतावा आकर्षक फंड निवडण्यापेक्षा परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड निवडणे कधीही चांगले.

डू इट युअरसेल्फ टाळावे:

अनेक गुंतवणूकदारांना आपल्या फंड निवडण्याच्या कामगिरीविषयी गर्व असतो. प्रत्यक्षात नेमका हा फंड तुम्ही का निवडलात याचे उत्तर गुंतवणूक दारांना देता येत नाही. गुंतवणूक विषयी निर्णय घेतांना कदाचित आकर्षक परताव्याचा दर या शिवाय दुसरे कारण सांगता येणार नाही. गुंतवणूक विषयक प्रत्येक निर्णय हा संशोधनाअंती घेणे गरजेचे असते. अनेक गोष्टी करतांना आपण तज्ञांची मदत घेत असतो मग फंडाची निवड करण्यासाठी योग्य सल्लागाराची निवड केली तर चुकले कुठे? आर्थिक नियोजक जो तुमच्या गरजा समजेल आणि तुमच्या गरजांची पूर्तता करणारम्य़ा फंडाची शिफारस करेल अशा सल्लागाराचा शोध घ्यावा.

गुंतवणुकीचा निर्णय न घेणे :

गुंतवणुकीचा निर्णय न घेणे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे टाळणे या सारखी घोडचूक असू शकत नाही. गुंतवणुकीचा निर्णय रहित करणे म्हणजे चRवाढ व्याज या संकल्पानेकडे डोळे झाक करणे. गुंतवणुकीचा निर्णय ५ वर्षांसाठी रहित करणे म्हणजे एकूण गुंतवणूक कालावधी कमी झाल्यामुळे ४५ ते ५० टक्के कमी रक्कम उद्दिष्टपूर्तीवेळी मिळणे.

अनेक वर्षांच्या संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना त्याच चुका पुन्हा करतात. गुंतवणूकदरांनी या चुका टाळल्या तर परताव्याचा दर वाढेल व गुंतवणूक करण्याचा पूर्ण फायदा घेता येईल. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात हे मॉर्निंगस्टार इंडिया प्रा. लि. चे (म्युच्युअल फंड संशोधन) संचालक कौस्तुभ बेलापूरकर सांगत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 1:47 am

Web Title: how to choose the best mutual fund scheme
Next Stories
1 नोटाबंदीनंतर १००० रुपयांच्या ९९% नोटा आरबीआयकडे जमा?
2 दोन अंकी विकासदर ध्यास हा कर्ज-ओझे वाढविणारा
3 नंदन निलेकणींची ‘घरवापसी’! इन्फोसिसच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी निवड
Just Now!
X