प्राप्तीकर भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे आणि तो वेळेवर भरण्यासाठी तुम्ही दस्तावेज गोळा करण्यात व्यस्त असाल. असे तुम्ही एकटे नसणार कारण सर्व करदाते प्रत्येक वित्तीय वर्षांत याच अनुभवातून जातात. सर्व तयारी आणि प्रयत्न करूनही शेवटी तुम्ही चुकीचा रिटर्न भरता. परतावा भरण्याची घाई, करांची चुकीची मोजणी, इन्कमटॅक्स रिटर्न अर्जात बदल आणि चुकीचा पत्ता या दरवर्षी होणारया सामन्य चुका आहेत. करदात्यांना परतावे अचूक भरता यावेत यासाठी ऑल इंडिया आयटीआर मध्ये इ-फायिलग मध्ये होणारया सामान्य चुका आणि त्यावरील उपाय दिले आहेत.

चूक १ : परतावा अजिबात न भरणे

अनेक व्यक्तींचा असा समज असतो की त्यांचा कोणताही कर बाकी नसल्याने त्यांना रिटर्न्‍स भरण्याची गरज नाही. पण, जरी तुम्ही कोणत्याही कराचे देणे लागत नसलात तरी तुमची कराची नोंद अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला रिटर्न्‍स भरणे आवश्यक आहे.

उपाय

प्राप्तीकर कायद्यानुसार कोणाचेही उत्पन्न वार्षकि  २.५ लाख असल्यास त्याने कर परतावा भरणे आवश्यक आहे. कोणतीही वजा होण्याआधी उत्पन्न मोजले जाते.

चूक २ : योग्य वैयक्तिक माहिती न भरणे

प्रत्येक वर्षी प्राप्तीकर विभाग चुकीची वैयक्तिक माहिती असल्याने अनेक अर्ज अस्वीकृत करतो. फक्त कल्पना करा की तुमचा रोख परतावा दुसर्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाला किंवा तुमचा चेक चुकीच्या पत्त्यावर गेला.

उपाय

तुमची वैयक्तिक माहिती अचूक भरा आणि पुन्हा एकदा तपासा. गेल्या काही वर्षांत काही मध्यस्थांनी सॉफ्टवेअर (ऑल इंडिया आयटीआर सहित) विकसित केली आहेत ज्याद्वारे तुमची माहिती फॉर्म १६ मधून आपोआप घेतली जाते.

चूक २ : अचूक उत्पन्न न दाखवणे

काही वेळा करदाते अचूक उत्पन्न दाखवू शकत नाहीत (इतर स्त्रोतातून उत्पन्न). कर चुकवण्यासाठी उत्पन्न लपवणे हा गुन्हा आहे, त्याच बरोबर तुमचा पॅन ट्रॅक होत असल्यामुळे तुम्ही उत्पन्न लपवू शकत नाही.

उपाय

तुमचे उत्पन्न जाहीर करा, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, गृह मालमत्ता आणि मुदत ठेवींवरील व्याज यासहीत सर्व उत्पन्न जाहीर करा.

चूक ४ : फॉर्म २६ एएसकडे दुर्लक्ष करणे

कर तज्ज्ञांनुसार परतावा भरण्याआधी तिने/त्याने फॉर्म २६एएस बघणे आवश्यक आहे. पण खूप कमी जण याकडे लक्ष देतात.

उपाय

फॉर्म २६ एएस अथवा टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट हे तुमच्या वैयक्तिक कराचा इतिहास समजण्यासाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. यात कर डिटेक्टर्सनी कापलेला कर, भरलेला अग्रिम कर आणि सेल्फ अ‍ॅसेसमेंट टॅक्स आणि मिळालेला परतावा ही माहिती दिलेली असते. याचा अभ्यास केल्याने तुम्हाला अचूक कर भरणे शक्य होते.

चूक ५ : अग्रिम कर किंवा सेल्फ-अ‍ॅसेसमेंट कर न भरणे

काही करदात्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत हे असे असतात जिथे टीडीएस लागू होत नाही. अशा बाबतीत अग्रिम कर किंवा सेल्फ अ‍ॅसेसमेंट कर प्रत्येक वित्तीय वर्षांच्या शेवटी भरणे आवश्यक आहे. यात अपयश आल्यास तुम्ही प्रत्येक महिना १% दंड १ एप्रिल पासून प्रत्येक वर्षी भरावा लागतो.

उपाय

अशी परिस्थिती टाळण्यासाठी करदात्याने देय तारखेच्या आधी अग्रिम कर किंवा सेल्फ-अ‍ॅसेसमेंट टॅक्स भरणे आवश्यक आहे.

चूक ६ : योग्य आयटीआर फॉर्म न वापरणे

प्राप्तीकर खाते इ-फायिलगसाठी विविध फॉम्र्स उपलब्ध करते. या वित्तीय वर्षांपासून एकूण अर्ज ७ पर्यंत कमी करण्यात आले आहेत. काही अर्ज बंद करण्यात आले आहेत तर काही अर्ज इतर अर्जात विलीन करणात आले आहेत. चुकीचा अर्ज निवडल्यास तुमचा इन्कमटॅक्स रिटर्न नाकारला जाऊ शकतो आणि तुम्हाला सुधारित रिटर्न भरायला सांगितला जाऊ शकतो.

उपाय

तुम्हाला सांगण्यात आलेला अर्ज काळजीपूर्वक निवडा. जर तुम्हाला कोणता फॉर्म निवडावा हे कळत नसेल तर ऑल इंडिया आटीआरकडील व्यावसायिक पर्यायांचा वापर करू शकता.

चूक ७ : रिटर्न्‍स वेरीफाय न करणे

काही करदाते आयटीआर-श् स्वत स्वाक्षरी करून सीपीसी, बंगळूरला पाठवायला विसरतात. जर तुमचा आयटीआर तुम्ही दाखल केला नाहीत तर तुम्ही केलेले इ-फायिलग रद्दबातल ठरू शकते.

उपाय

रिटर्न भरल्यापासून आयटीआर- १२० दिवसात सीपीसी, बंगळूरकडे पाठवा. परंतु, डिजिटल सिग्नेचरने भरण्यात आलेल्या रिटर्न्‍सना लागू होत नाही. नेटबँकिंग किंवा आधारद्वारे सुद्धाही तुम्ही इ-वेरीफाय करू शकता.

चूक ८ : सुधारित रिटर्न्‍स न भरणे

करदाते ही सर्वात मोठी चूक करतात. जर तुम्ही इ-फायिलग मध्ये चूक केली असल्यास तुम्ही ती सुधारित रिटर्न्‍स मध्ये सुधारू शकता. याकडे जे करदाते दुर्लक्ष करतात त्यांचे आयटीआर रद्द होऊ शकतात किंवा त्यांना दंड भरावा लागू शकतो.

उपाय

जर तुमच्या हे लक्षात आले की तुम्ही तुमचे उत्पन्न आणि बचत ही योग्य प्रकारे दाखवलेली नाही तर तुम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी सुधारित रिटर्न्‍स भरू शकता. गेल्या वर्षी पर्यंत वित्तीय वर्ष संपल्यापासून करदात्यांना २ वर्षांपर्यंत सुधारित रिटर्न्‍स भरता येऊ शकत होते. वित्तीय वर्ष २०१७-१८ पासून हा काळ एका वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

चूक ९ : वेगवेगळ्या १६ नंबर फॉम्र्ससाठी एकच आयटीआर न भरणे

नोकरी बदलणे हे पगारदारांमध्ये सामन्य बाब आहे ज्यामुळे त्यांना १६ नंबरचे विविध फॉम्र्स मिळू शकतात. रिटर्न्‍स भरताना अनेक जण वेगवेगळे आयटीआर वापरतात.

उपाय

एका करदात्याने एकच आयटीआर भरणे आवश्यक आहे आणि सर्व १६ नंबरचे फॉर्म दाखवणे आवश्यक आहे. तुम्ही सगळे १६ चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.

चूक १० : कर नियमात अलीकडे करण्यात आलेले बदल माहिती नसणे

प्रत्येक अर्थसंकल्पात आपण कर विषयक नियम बदललेले बघतो. कर टप्पे, सूट आणि फॉम्र्स मध्येही तुम्ही बदल बघू शकता.

उपाय

प्राप्तीकर भरण्याआधी तुम्ही नुकतेच करण्यात आलेल्या बदलांच्याबाबत पूर्ण माहिती करून घ्या. इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याच्या प्रयत्नात असलेल्या करदात्याने अशा चुका करणे टाळावे. जरी यात सुधारणा करणे शक्य असले तरी पहिल्याच प्रयत्नात त्यात सुधारणा करणे शक्य आहे आणि एकाच प्रयत्नात काम होते.

विकास दाहीया

लेखक ऑल इंडिया आयटीआरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.