मुंबई : राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळावर हृषिकेश अरविंद मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भारत सरकारने १३ मे २०२१ रोजीच्या अधिसूचने अन्वये सरकारचे नामनिर्देशित संचालक म्हणून मोडक यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

हृषिकेश मोडक हे मणिपूर कॅडरचे भारतीय प्रशाकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठाशी संलग्न फग्र्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्राात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी मोडक यांनी महाराष्ट्र राज्यातील वाशीम येथे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे. हृषिकेश मोडक यांनी विक्रीकर आयुक्त व मणिपूर राज्यातील उखरूळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी म्हणूनदेखील काम केले आहे.

Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
Job Opportunity Opportunities in Maharashtra State Police Force
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील संधी
Sadanand Date also worked as a DIG in the Central Bureau of Investigation and IG (ops) in the Central Reserve Police Force
मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दातेंची एनआयएच्या महासंचालक पदी नियुक्ती