20 November 2017

News Flash

एचटीसी अँड्रॉइड बटरफ्लाय : पाच इंचाचा एचडी दृश्याविष्कार!

अँड्रॉइड स्मार्टफोनचे पर्व भारतीय बाजारपेठेत सुरू करणाऱ्या तैवानच्या ‘एचटीसी’ने नवीन बटरफ्लाय नावाच्या देशातील सर्वाधिक

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 31, 2013 12:11 PM

अँड्रॉइड स्मार्टफोनचे पर्व भारतीय बाजारपेठेत सुरू करणाऱ्या तैवानच्या ‘एचटीसी’ने नवीन बटरफ्लाय नावाच्या देशातील सर्वाधिक स्मार्टफोन कालच नवी दिल्लीत समारंभपूर्वक अनावरण केले. अ‍ॅपल आयफोन ५ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस थ्रीच्या या नवीन स्पर्धकाची किंमत जरी ४९,९०० रुपये असली तरी तो जवळपास ४६ हजाराला बाजारात उपलब्ध होईल. पाच इंचाचा सुपर एलसीडी-थ्री स्क्रीन आणि सध्या भारतात उपलब्ध कोणत्याही फोनपेक्षा सर्वोच्च ४४१पीपीआय दृश्य बिंदू घनता आणि फूल एचडी व्हिडीओशी सुसंगती हे या फोनचे आगळे वैशिष्ट ठरावे. शिवाय भारतीय स्थितीत वापरास योग्य बनविणाऱ्या खास घटकांचा म्हणजे पाणी, धूळ-धुरळा आणि विजेचा झटका यांना प्रतिरोधक अशी त्याची रचना आहे.

First Published on January 31, 2013 12:11 pm

Web Title: htc android butterfly smartphone launched