आधुनिक किरकोळ विक्री दालनांची साखळी चालविणाऱ्या हायपरसिटी रिटेल (इंडिया) लि.ने त्यांच्या मुंबई परिसरातील पाचवे विक्री दालन पनवेलमध्ये नुकतेच सुरू केले. तब्बल ३१,००० चौरस फुटांचे विक्री क्षेत्र असलेले हायपरसिटी हे पनवेलमधील सर्वात मोठे विक्री दालन आहे. शॉपर्स स्टॉपचे गोविंद श्रीखंडे आणि मराठी अभिनेते पुष्कर श्रोती यांच्या प्रमुख उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन झाले. पनवेल रेल्वे स्थानकापासून नजीक मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या दालनात कपडे, पादत्राणे, व्यक्तिगत निगा व फिटनेस उत्पादने, घर सजावटीचे सामान, उपकरणे, खेळणी, स्वयंपाकघरातील वस्त यांसह ताजी फळं, भाज्या व धान्य आदी ग्राहकांना उपलब्ध होतील. मटण, मासे आणि बेकरी उत्पादनांचा स्वतंत्र विभागही येथे असेल. हायपरसिटीचे हे हे राज्यातील पाचवे तर देशातील १८ वे दालन आहे.