News Flash

Coronavirus: HDFC आणि ICICI बॅंकेने केले ‘हे’ मोठे बदल

तुर्तास ३१ तारखेपर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.

देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात आली आहे. देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परंतु त्यातून बँकींकसह काही क्षेत्रांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बँकांनीही खबरदारी घेत आपल्या कामकाजात काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. खासगी क्षेत्रातील दिग्गज बँका HDFC आणि ICICI बँकेनं काही बदल केल्याची सोमवारी सूचना दिली. ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वापर करावा, असं आवाहन बँकांकडून करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून या बँकांनी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.

एचडीएफसी बँकेनं आपल्या कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही बँक कार्यरत राहणार आहे. तसंच परदेशी चलन बदलणं आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. रविवारी बँकेनं ग्राहकांना यासंबंधी सुचनादेखील पाठवल्या आहेत.

डिजिटल बँकींगचा वापर करा
तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून बदल केल्याची माहिती दिली आहे. “आमच्या सर्व शाखांमध्ये स्वच्छतेविषयी विशेष लक्ष देण्यात येईल. तसंच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी राहिल. तसंच ग्राहक मदत केंद्रांमध्येही कर्मचाऱ्यांची संख्या कमी राहिल. आम्ही सुरक्षेवर लक्ष देण्याचं आवाहन करत आहोत. तसंच महत्त्वाच्या बँकींग सेवांसाठी आय-मोबाईल किंवा इंटरनेट बँकींगचा वापर करावा,” असं बँकांकडून सांगण्यात आलं आहे.

पेझॅप, यूपीआय वरून करा बिलांचा भरणा
एचडीएफसी बँकेनं शाखांमधील गर्दी कमी करण्यासाठी ड्रॉपबॉक्समध्ये चेक टाकण्यास सांगितलं आहे. तसंच पासबुक अपडेट आणि फॉरेक्स कार्ड रिलोड सारख्या सुविधांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस आणि यूपीआयसारख्या माध्यमांचा वापर करून ट्रान्झॅक्शन करण्यास बँकेनं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त यूपीआय किंवा पेझॅपसारख्या माध्यमांचा वापर करून बिलांचा भरणा करावा, असंही बँकेनं नमूद केलं आहे,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:42 am

Web Title: icici bank hdfc bank changed their working hours reduced employee numbers coronavirus effect jud 87
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टीची ऐतिहासिक सत्रआपटी
2 Coronavirus : शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात २५०० अंकांची घसरण
3 दशकातील भयाण पडझडीच्या सप्ताहात
Just Now!
X