12 December 2017

News Flash

आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स फंडाला ‘क्रिसिल’चे सर्वोच्च मानांकन

सलग तिसऱ्या तिमाहीत फंडाची उल्लेखनीय कामगिरी

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 30, 2017 3:04 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सलग तिसऱ्या तिमाहीत फंडाची उल्लेखनीय कामगिरी

भांडवली बाजाराला मंदीवाल्यांचा वेढा पडला आहे आणि प्रमुख निर्देशांक आठवडाभरात दोन-अडीच टक्क्यांनी गडगडले असताना, गुंतवणूकदार या अस्थिरतेत तुलनेने तग धरतील अशा पर्यायाच्या शोधात आहेत. या पाश्र्वभूमीवर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स फंडाने सलग तिसऱ्या तिमाहीत ‘क्रिसिल’च्या म्युच्युअल फंडाच्या क्रमवारीत निरंतर वरचे (१ वा २) मानांकन मिळविण्याची कामगिरी केली आहे.

नोव्हेंबर १९९९ मध्ये सुरुवात करणाऱ्या या फंडाने आपल्या संदर्भ निर्देशांकापेक्षा (क्रिसिल बॅलन्स्ड फंड अ‍ॅग्रेसिव्ह इंडेक्स) सरस कामगिरी केली आहे. ३० मार्च २००२ रोजी हा निर्देशांक अस्तित्वात आला, तेव्हापासून १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत निर्देशांकाचा परतावा १२.७३ टक्के इतका आहे, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स फंडाने १८.१४ टक्के इतका परतावा दिला आहे.

दीर्घ मुदतीत भांडवल वृद्धीसाठी समभाग गुंतवणूक आणि त्याचवेळी जोखीम संतुलनासाठी स्थिर उत्पन्न पर्यायातही गुंतवणूक करणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स फंडाचे निधी व्यवस्थापन एस. नरेन (समभागसंलग्न गुंतवणूक) आणि अतुल पटेल व मनीष बांठिया (रोखे गुंतवणूक) यांच्याकडून संयुक्तरूपात केले जात आहे.

जून २०१७ अखेर फंडाची गुंतवणूकयोग्य गंगाजळी (एएयूएम) ११,७३४ कोटी रुपये होती. गेल्या तीन वर्षांत भांडवली बाजारातील तेजीच्या पाश्र्वभूमीवर फंडातून समभाग व समभागसंलग्न गुंतवणुकीचे सरासरी प्रमाण ७२.८२ टक्के राहिले आहे.

त्यातील पाच अव्वल गुंतवणुकांमध्ये बँकिंग, सॉफ्टवेअर सेवा, औषधी, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योग क्षेत्रातील समभागांचा ५१.८८ टक्के वाटा होता.

उच्च पतधारणा असलेल्या कंपनी रोखे आणि सरकारी रोख्यांमध्ये तीन वर्षांत अनुक्रमे ६.९८ टक्के आणि १५.७७ टक्के अशी फंडाची सरासरी गुंतवणूक राहिली आहे. बाजाराचा कल बदलत आला त्याप्रमाणे गुंतवणुकीसाठी निवडलेले पर्याय तसेच समभाग-रोखे संतुलनात बदल करून फंडाने निरंतर सरस परतावा दिला आहे.

नोव्हेंबर १९९९ मध्ये सुरुवात करणाऱ्या या फंडाने आपल्या संदर्भ निर्देशांकापेक्षा (क्रिसिल बॅलन्स्ड फंड अ‍ॅग्रेसिव्ह इंडेक्स) सरस कामगिरी केली आहे. ३० मार्च २००२ रोजी हा निर्देशांक अस्तित्वात आला, तेव्हापासून १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत निर्देशांकाचा परतावा १२.७३ टक्के इतका आहे, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स फंडाने १८.१४ टक्के इतका परतावा दिला आहे.

First Published on September 30, 2017 3:04 am

Web Title: icici prudential balanced fund crisil mutual fund ranking list