फंड मालमत्तेत ‘एचडीएफसी एमएफ’ मागे
म्युच्युअल फंड मालमत्तेत आतापर्यंत वरचष्मा असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनीला स्पर्धक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलने मागे टाकले आहे. फेब्रुवारी २०१६ अखेर आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फंडची मालमत्ता १,७४,४३९ कोटी रुपये राहिली आहे. तर एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी याबाबत ४,००० कोटी रुपयांनी मागे पडत १,७०,४११ रुपयांवर स्थिरावली आहे.
या दोन्ही कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून एक लाख कोटी रुपयांच्या निधी व्यवस्थापनाच्या कक्षेत आहेत. एक लाख कोटी रुपयांच्या निधी व्यवस्थापनात या व्यतिरिक्त रिलायन्स (१,५४,७३६ कोटी रुपये), बिर्ला सन लाईफ (१,३१,६८९ कोटी रुपये)व स्टेट बँक (१,०६,६२२ कोटी रुपये) या तीन अव्वल कंपन्या आहेत.
देशातील ४३ फंड कंपन्यांकडून विविध योजनांद्वारे मालमत्तेचे व्यवस्थापन होणारी फेब्रुवारीअखेरची रक्कम १२.६३ लाख कोटी रुपये आहे. एकूण फंड मालमत्ता मात्र गेल्या महिन्यात जानेवारीमधील १२.७४ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत रोडावली आहे.

लाख कोटींचे धनी
आयसीआय.प्रु. रु. १,७४,४३९ कोटी
रिलायन्स रु १,५४,७३६ कोटी
बिर्ला सन लाईफ रु. १,३१,६८९ कोटी
स्टेट बँक रु. १,०६,६२२ क८ोटी

ग्राहकांना चांगला गुंतवणूक अनुभव देण्यावर आमचा व्यवसाय केंद्रीत आहे. योग्य परिणामतेसह जबाबदारीचे उत्तम व्यवस्थापन यामुळे हे यश आम्हाला संपादित करता आले. गुंतवणूकदार आणि गुंतवणूक यावर आमचे लक्ष्य निश्चितच कंपनीची मालमत्ता वाढविण्यास उपयोगी ठरतील.
– निमेश शाह, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसी.