08 July 2020

News Flash

आयडीबीआय बँकही ‘मोबाईल बँकिंग’ प्रांगणात

नव्या पिढीच्या सार्वजनिक क्षेत्राती आयडीबीआय बँकेने आपले ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप’ बुधवारी दाखल करून, या नव्या धाटणीच्या बँकिंगची अनुभूती आपल्या ग्राहकांसाठी खुली केली.

| February 26, 2015 06:23 am

आयडीबीआय बँकही ‘मोबाईल बँकिंग’ प्रांगणात
नव्या पिढीच्या सार्वजनिक क्षेत्राती आयडीबीआय बँकेने आपले ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप’ बुधवारी दाखल करून, या नव्या धाटणीच्या बँकिंगची अनुभूती आपल्या ग्राहकांसाठी खुली केली. ‘आयडीबीआय बँक गो मोबाईल’ असे बँड्रिंग असलेले हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीवर उपलब्ध झाले असून गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करता येईल.
आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना या नव्या सुविधेमुळे कुठूनही, केव्हाही (दिवसाचे २४ तास आठवडय़ाचे सातही दिवस) बँकेशी मोबाईल फोनचा वापर करून संलग्नता साधता येईल.
ग्राहकांना या अ‍ॅपद्वारे निधी हस्तांतरण, बिल पेमेंट, मोबाईल/डीटीएच रिचार्ज, आयएमपीएसमार्फत तात्काळ विदेशातील आप्ताला निधी धाडणे, बचत, चालू खाते, मुदत अथवा आवर्ती खात्यातील ठेवी, कर्ज खाते, डिमॅट खाते यांचे विवरण पाहता येईल.

डिजिटल भारत प्रोत्साहनांतर्गत शिक्षणालाही सामावून घ्यावे
शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने यंदाचा पूर्ण अर्थसंकल्प कार्य करेल, अशी अपेक्षा आहे. विद्यमान सरकारकडून यापूर्वीही या क्षेत्रासाठी उचललेल्या पावलांचे आम्ही स्वागतच केले आहे. भारतीय शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणातील गुंतवणुकीची गरज आहे. या दिशेने, शिक्षण क्षेत्रात खासगी भांडवल उभारणीस परवानगी देण्यासह मागणीनुरूप गुणवत्तापूरक शैक्षणिक संस्था अस्तित्वात यायला हव्यात. शैक्षणिक क्षेत्रातील संधीचा अधिकाधिकांना लाभ होण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील बहुनियमांमध्ये सुसूत्रता येण्याची गरज आहे. विदेशी शैक्षणिक संस्थांना भारतातील प्रवेश खुला करण्याने भारतीय शिक्षण क्षेत्राला निश्चितच प्रोत्साहन मिळेल. याबाबतचे अडथळे सरकारने नाहीसे करावे. या दिशेने विदेशी पदव्यांचे महत्त्वही विचारात घ्यावे. पंतप्रधानांच्या डिजिटल भारत प्रोत्साहनांतर्गत डिजिटल शिक्षणालाही महत्त्व द्यावे; यासाठी नव्या केंद्रीय अर्थसंकल्पात ठोस आर्थिक तरतूदही असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2015 6:23 am

Web Title: idbi mobile banking
Next Stories
1 केंद्रीय महसुलात राज्यांचा वाटा वाढला
2 ‘सेन्सेक्स’ समभागांत विदेशी गुंतवणूक सर्वोच्च टप्प्यावर
3 ‘किंगफिशर हाऊस’वर ‘स्टेट बँके’चा ताबा
Just Now!
X