05 March 2021

News Flash

घसरत्या व्याजदर काळात आदर्श गुंतवणूक पर्याय

जीवनाचे विविध टप्पे आणि मुख्यत्वे जोखीम पेलण्याची क्षमता

जीवनाचे विविध टप्पे आणि मुख्यत्वे जोखीम पेलण्याची क्षमता यानुसार प्रत्येकासाठी त्यांच्या पुंजी नेमकी कुठे व कशी गुंतविली जावी, याचे नियोजन केले जाते. तुम्ही निश्चित केलेल्या लांबच्या आर्थिक ध्येयासाठी उपयुक्त असे हे गुंतवणूक पर्याय असतील, याची काळजी घेतली जाते. अर्थात लाभ आणि जोखीम यांत उत्तम संतुलन साधले जाईल, अशा तऱ्हेनेच तुमची गुंतवणूक या विविध पर्यायात विभागली जाते. याच अंगाने तुलनेने स्थिर परतावा देणाऱ्या रोखे अर्थात डेट साधनांचा ऊहापोह करू या.
एप्रिलमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करून ते गत पाच वर्षांतील सर्वात खालच्या म्हणजे ६.५ टक्के पातळीवर आणले आहेत. जानेवारी २०१५ पासून अर्थव्यवस्था उभारी घेत असल्याचे पाहून रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात एकूण दीड टक्क्यांची कपात केली आहे.
ज्या मंडळींनी गृहकर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी कर्जावरील घटते व्याजदर ही निश्चितच मोठय़ा आनंदाची बाब आहे. नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना तर अल्पमुदतीसाठी कर्ज घेऊनही दरमहा हप्ता (ईएमआय) कमी राखता येणार आहे. त्यामुळे तुलनेने मोठय़ा रकमेची कर्जउचल त्यांना करता येणार आहे. उद्योग क्षेत्राला कमी दरात कर्ज उभारता येईल अथवा विद्यमान कर्जाची नव्याने पुनर्रचना करता येणार आहे. पण गुंतवणूकदार या नात्याने तुम्ही या स्थितीत काय करायला हवे? या स्थितीत तुमची दरमहा खर्च वजा शिल्लक राहणारा वाचणारा पैसा कोणत्या पर्यायाकडे वळला पाहिजे?
व्याजदर कपातीच्या परिणामी, यापूर्वी बाजारात दाखल झालेल्या दीर्घ मुदतीचे कर्जरोखे (बॉण्ड्स) आणि करमुक्त रोख्यांच्या बाजारातील किमती निश्चितच वाढल्या आहेत. त्याउलट पारंपरिकरीत्या मुदत ठेवींमध्ये पैसा गुंतविणाऱ्यांना त्यांच्या ठेवींवरील व्याज परतावा घटल्याचे पाहावे लागले आहे. अशा स्थितीतही गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे चांगले पर्याय निश्चितच आहेत.
ल्ल सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ): व्याजाचे दर लक्षणीय कमी होऊनही पीपीएफमधून वार्षिक ८.१ टक्के दराने करमुक्त परतावा मिळविणे शक्य आहे. दरसाल कमाल दीड लाखांची गुंतवणूक करून प्राप्तिकर वाचविता येईल. वरकड दीर्घ मुदतीसाठी उपलब्ध असणाऱ्या किंवा गुंतलेल्या पैशांची नजीकच्या काळात निकड न भासणाऱ्या मंडळींसाठी हा आदर्श गुंतवणूक पर्याय ठरतो. सध्या तर घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पीपीएफमध्ये गुंतवणूक करता येते. सारखाच परतावा दर असलेला परंतु केवळ पाच वर्षांसाठी गुंतवणूक मुदतबंद (लॉक्ड इन) होणारा दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) होय.
ल्ल सुकन्या समृद्धी योजना : गुंतवणूकदाराला जर कन्यारत्न असेल तर त्यांच्यासाठी हा आणखी एक उमदा पर्याय आहे. ‘सुकन्या समृद्धी योजने’त वार्षिक ८.६ टक्के व्याजदराने, (वार्षिक तत्त्वावर मोजला जाणारा आणि दरसाल चक्रवाढ गतीने वाढत जाणारा) परतावा मिळविता येईल. या पर्यायात बचत होणाऱ्या रकमेचा मुलीचे उच्चशिक्षण, लग्न वगैरे लांबच्या गरजा पालकांना पूर्ण करता येतील. योजनेचा मुदतबंद (लॉक्ड इन) कालावधी तुम्ही बचत केलेल्या पैशांचा विनियोग मुलीसाठी ठरविलेल्या दीघरेद्देशी लक्ष्यांसाठी उचित समयी कराल, याची खातरजमा करतो.
ल्ल ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठांसाठी दसादशे ८.६ टक्के परंतु दर तिमाहीला देय असलेल्या व्याजदराची योजना आहे. या योजनेत कमाल १५ लाख रुपयांपर्यंत निधी गुंतविता येईल.
ल्ल म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंडाच्या रोखे योजना हा सद्य:स्थितीतील सर्वोत्तम पर्याय ठरेल. एकुणात घटलेला महागाई दर आणि अर्थव्यवस्थेतील उसळीचे संकेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून आगामी काळात आणखी व्याजाचे दर आणखी खाली आणले जाण्याची शक्यता सुस्पष्टपणे दर्शवितात. त्यामुळे अशा स्थितीचे लाभार्थी ठरणाऱ्या फंडातील गुंतवणूक खूपच फायद्याची ठरू शकेल. दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर वाचविण्यासाठी गुंतवणूकदारांनी या फंडात तीन वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक राखणे आवश्यक ठरेल. तीन वर्षांनंतर गुंतवणूकदारांना इंडेक्सेशनचा लाभ मिळेल आणि त्याला केवळ इंडेक्सेशनद्वारे वजा होणाऱ्या परताव्यावर २० टक्के दराने कर भरावा लागेल. गुंतवणूकदाराचा उत्पन्न स्तर सर्वोच्च करपात्रतेत मोडणारा असेल तर त्याच्यासाठी हा एक विशेष लाभ ठरेल.
म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांकडे तज्ज्ञ दृष्टिकोन असतो आणि व्याजदराच्या स्थितीतील हालचालीवर त्यांची करडी नजर असते. त्यामुळे त्यांची हाती आपला पैसा गुंतवणुकीसाठी सोपविणे हितावहच ठरेल. सामान्य गुंतवणूकदाराला सर्वोत्तम पतधारणा असलेल्या रोख्यांची निवड करणे अवघड जाईल, पण ते अनुभवी निधी व्यवस्थापकासाठी सोपे ठरते. शिवाय निधी व्यवस्थापकांच्या दिमतीला विश्लेषकांचा एक मोठा संघ असतो, जे निरंतर बाजार स्थितीवर लक्ष ठेवून तिचे विश्लेषण करीत असतात.

– सुदिप्तो रॉय
(लेखक ‘प्रिन्सिपल रिटायरमेंट अ‍ॅडव्हायजर्स’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 7:46 am

Web Title: ideal investment option
Next Stories
1 आफ्रिकेतील तेल व्यवसायाची ‘रिलायन्स’कडून विक्री
2 ‘बीएसई’ भागविक्रीद्वारे ३० टक्के भागभांडवल विकणार!
3 दिल्लीत ‘सेबी’चे विशेष न्यायालय
Just Now!
X