News Flash

आयजी इंटरनॅशनलचा होरा आफ्रिकी फळांच्या व्यापाराकडे!

ताज्या फळांच्या आयात-निर्यात व्यापारातील देशातील सर्वात मोठी कंपनी आयजी इंटरनॅशनलने युरोप-अमेरिकेनंतर आता निसर्गसंपदेने समृद्ध आफ्रिकेतील रसदार फळांचा भारतीयांना आस्वाद देण्यासाठी पाऊल टाकले आहे.

| August 19, 2015 03:50 am

ताज्या फळांच्या आयात-निर्यात व्यापारातील देशातील सर्वात मोठी कंपनी आयजी इंटरनॅशनलने युरोप-अमेरिकेनंतर आता निसर्गसंपदेने समृद्ध आफ्रिकेतील रसदार फळांचा भारतीयांना आस्वाद देण्यासाठी पाऊल टाकले आहे. अत्युत्कृष्ट चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील व्हॅलेन्सिया संत्रे भारतात प्रथमच कंपनीकडून सादर झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका हे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा संत्रे उत्पादक देश आहे. तेथील स्टार साउथ या कंपनीशी भागीदारी करीत व्हॅलेन्सिया हे चव, रस गुणवत्ता आणि पोषणविषयक अनेक फायदे असलेली संत्र्याची जात भारतात आयात केली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे भारतात सध्या उपलब्ध देशी व आयात केलेल्या संत्र्यांच्या तुलनेत दर्जेदार असण्याबरोबरच, किमतीलाही ते स्वस्त पडेल, असे आयजी इंटरनॅशनलचे संचालक संजय अरोरा यांनी सांगितले.
नवी मुंबईत मुख्यालय व राज्याच्या अनेक भागांत मालगोदामे असणाऱ्या या कंपनीकडे तापमान नियंत्रक वाहनांचा मोठा ताफा व दळणवळण यंत्रणा आहे. देशातील सर्वात मोठी द्राक्ष व डाळिंब निर्यातदार असणारी ही कंपनी सध्या विविध १५ देशांतून वेगवेगळ्या ३० जातींची फळांची आयात करून भारतात वितरण करीत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:50 am

Web Title: ig international to sale south africa orange in indian market
Next Stories
1 दोन वर्षांत ५० विक्री दालनांचे ‘स्पेसवूड’चे लक्ष्य
2 रुपया दोन वर्षांच्या तळात
3 बिगर मोसमी पावसाचा कृषी क्षेत्राला फटका
Just Now!
X