07 March 2021

News Flash

‘आयएल अँड एफएस’ उपकंपन्यांची हिस्सा विक्री प्रक्रिया सुरू

समूहातील ‘आयएल अँड एफएस सिक्युरिटीज सव्‍‌र्हिसेस’

आघाडीच्या व्यापारी बँका तसेच वित्त कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यात अपयशी ठरलेल्या ‘आयएल अँड एफएस’च्या उपकंपन्यांमधील हिस्सा विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. समूहातील दोन उपकंपन्यांना याबाबत डझनभर उत्सुक कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.

‘आयएल अँड एफएस’ समूहाने १२ नोव्हेंबर रोजी तिच्या दोन प्रमुख उपकंपन्यांमधील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरू करण्याचा प्राथमिक निर्णय घेतला होता. समूहाच्या विविध सुमारे २४८ उपकंपन्या आहेत. पैकी निम्म्या उपकंपन्यांचे कार्यक्षेत्र विदेशात आहे.

समूहातील ‘आयएल अँड एफएस सिक्युरिटीज सव्‍‌र्हिसेस’ आणि ‘आयएल अँड एफएस सेटलमेंट अँड ट्रान्झेक्शन सव्‍‌र्हिसेस’ या उपकंपन्यांमधील हिस्सा विक्रीकरिता मिळालेला प्रतिसाद बँक, वित्त सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळाला असल्याचे समूहाने सोमवारी स्पष्ट केले. काही गुंतवणूक कंपन्यांनीही रस दाखविल्याचे सांगण्यात आले. याबाबतची उत्सुकता दर्शविण्यासाठी खरेदीदारांना २३ नोव्हेंबपर्यंत संधी होती, असेही नमूद करण्यात आले आहे.

‘आयएल अँड एफएस’कडून कर्जाचे हप्ते थकल्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्या या त्यातील गुंतवणुकीमुळे चर्चेत आल्या. अर्थव्यवस्थेवर या रूपात नवे वित्तसंकट उभारून येत असतानाच सरकारने या कंपनीवर संचालक मंडळ नेमले. कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखालील नवनियुक्त संचालक मंडळाने याबाबतचा आपला अहवाल केंद्रीय कंपनी व्यवहार खाते तसेच राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे सादर केला आहे. समूहाच्या पुनर्बाधणीची प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. समूहावर सुमारे ९४,२१५.६० कोटी रुपयांचा कर्जभार आहे.

समूह उपकंपनीने व्याज थकविले

आयएल अँड एफएस समूहातील आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क्‍सने दोन अपरिवर्तनीय कर्ज रोख्यांवरील २.२८ कोटी रुपयांचे व्याज थकविले आहे. २६ नोव्हेंबर रोजीपर्यंत ही रक्कम देणे अपेक्षित होते; मात्र ती थकल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती भांडवली बाजारालाही कळविण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजी दोन रोखे जारी करण्यात आले होते. दरम्यान कंपनीचा समभाग दिवसअखेर ४ टक्क्य़ांनी घसरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:05 am

Web Title: il and fs crisis 10 group firms to be up for sale
Next Stories
1 भांडवली बाजारात निर्देशांक झेप
2 ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’मुळे दहा लाख नोकऱ्या
3 महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन साधने निर्मिती प्रकल्प
Just Now!
X