बिर्ला म्युच्युअल फंडाचे बालसुब्रमण्यम यांचा दावा

मुंबई : आयएल अँड एफएसच्या पतनास रिझव्‍‌र्ह बँकेची धोरणे अंशत: कारणीभूत ठरल्याचे प्रतिपादन आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि म्युच्युअल फंडांची शिखर संघटनेचे माजी अध्यक्ष ए. बालसुब्रमण्यम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाच्या वार्षकि परिषदेत ते बोलत होते. मोठय़ा प्रमाणावर वाढलेल्या बँकांच्या अनुत्पादित कर्जामुळे एकाच वेळी ११ राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश रिझव्‍‌र्ह बँकेने ‘त्वरित सुधारणा कार्यवाही (पीसीए)’त केला. त्यातून या बँकांना नव्याने कर्ज देण्यावर र्निबध आले. परिणामी, आयएल अँड एफएससारख्या कंपन्या ज्या मोठय़ा प्रमाणावर बँकांच्या कर्जावर अवलंबून होत्या त्यांचा कर्जपुरवठा कमी झाल्याने तिच्या उपकंपन्यांना रोकड चणचणीला सामोरे जावे लागले. ज्याचा परिणाम असा की, आयएल अँड एफएसला मुदतपूर्ती झालेल्या रोख्यांचे पसे आदित्य बिर्ला  सन लाइफ म्युच्युअल फंडासहित अन्य म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परत करता आले नाहीत.

आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडासहित अनेक म्युच्युअल फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यात घट झाल्याने लिक्विड फंडातील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला होता, या संदर्भात कारणमीमांसा करताना ए. बालसुब्रमण्यम यांनी वरील प्रतिपादन केले. बिर्ला म्युच्युअल फंडाला २५ वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्युच्युअल फंड वितरकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मॉìनगस्टार आणि क्रिसिल यांना आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाला ‘बेस्ट फंड हाऊस – इक्विटी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंड, आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंट लाइफ इक्विटी फंड आणि आदित्य बिर्ला सनलाइफ टॅक्स रिलीफ ९६ या त्यांच्या फंडानी एक अब्ज डॉलर मालमत्तेचा टप्पा गाठल्याचे ए. बालसुब्रमण्यम यांनी सांगितले.