News Flash

यूटीआय एमएफची हंगामी सूत्रे रेहमान यांच्याकडे

पुरी यांच्या पाच वर्षांचा कालावधी नुकताच संपुष्टात आला होता.

इम्तैयाझुर रेहमान

मुंबई : निधी व्यवस्थापनात चौथ्या स्थानावर असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची हंगामी सूत्रे इम्तैयाझुर यांच्याकडे आली आहेत. पाच वर्षे कालावधीनंतर मुदतवाढीवरून अमेरिकी भागीदार कंपनीने आक्षेप घेतल्याने लिओ पुरी यांनी व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्याधिकारीपदाचा सोमवारी राजीनामा दिला.

फंड कंपनीत सध्या वित्त, लेखा तसेच करविषयक व्यवसाय हाताळणाऱ्यत्यातयात  इम्तैयाझुर रेहमान यांच्याकडे तूर्त सूत्रे देण्यात आली आहेत. संचालक मंडळाच्या जानेवारीत होणाऱ्या बैठकीत नवा मुख्याधिकारी निवडला जाण्याची शक्यता आहे.

पुरी यांच्या पाच वर्षांचा कालावधी नुकताच संपुष्टात आला होता. मात्र त्यांच्या मुदतवाढीस कंपनीत २६ टक्के हिस्सा असलेल्या टी रो प्राईसने आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर कंपनीच्या भागधारकांचीही पुरी यांच्यावर नाराजी होती.

पुरी यांच्या नवनियुक्तीला टी रो प्राईसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आक्षेप नोंदविला होता. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी सोमवारी सायंकाळी राजीनामा दिला. भांडवली बाजारात उतरण्याच्या प्रक्रियेपर्यंत पुरी यांना कायम ठेवण्याबाबत यूटीआय म्युच्युअल फंडमधील एका गटाचा कल होता. कंपनीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा हिस्सा वाढीबाबत टी रो प्राईसचा नकार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:41 am

Web Title: imtaiyazur rahman takes over as interim ceo of uti mf
Next Stories
1 रूपया गडगडल्याने अशाप्रकारे तुमच्या खिशाला लागणार कात्री!
2 हिरो मोटोकॉर्पचा एक्स्ट्रीम २०० आरद्वारे प्रिमियम श्रेणीत पुनर्प्रवेश
3 कोणता म्युच्युअल फंड खरेदी करत आहात?
Just Now!
X