08 December 2019

News Flash

जुलैमध्ये व्यापार तूट सावरून चार महिन्यांच्या तळात

यापूर्वीची किमान व्यापार तूट मार्च २०१९ मध्ये १०.८९ अब्ज डॉलर होती.

| August 15, 2019 02:42 am

नवी दिल्ली : वाढत्या निर्यातीमुळे गेल्या महिन्यातील व्यापार तूट गेल्या चार महिन्यांच्या तळात विसावली आहे. जुलैमध्ये निर्यात २.२५ टक्क्य़ांनी वाढल्याने अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बनलेली व्यापार तूट सावरत १३.४३ अब्ज डॉलर नोंदली गेली. आयात-निर्यातीतील ही दरी चार महिन्यांच्या किमान स्तरावर आहे.

यंदा निर्यात २६.३३ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत – जुलै २०१८ मध्ये ती तुलनेत कमी – २५.७५ अब्ज डॉलर होती. तर यंदा आयात  १०.४३ टक्क्य़ांनी घसरून ३९.७६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

तेल, सोने या वस्तूंच्या आयातीमार्फत सरकारच्या तिजोरीवर भार पडत असताना यंदा या गटातील आयात कमी झाल्याची सकारात्मक बाब पाहावयास मिळाली आहे. वर्षभरापूर्वी, व्यापार तूट १८.६३ अब्ज डॉलर होती. तर यापूर्वीची किमान व्यापार तूट मार्च २०१९ मध्ये १०.८९ अब्ज डॉलर होती.

घाऊक महागाई दर दोन वर्षांच्या किमान स्तरावर

नवी दिल्ली : किरकोळ पाठोपाठ गेल्या महिन्यातील घाऊक महागाई दरानेही दिलासा दिला आहे. जुलैमध्ये घाऊक महागाई दर १.०८ टक्के असा गेल्या तब्बल २५ महिन्यांच्या किमान स्तरावर स्थिरावला आहे.

अन्नधान्याच्या किंमतीसह इंधन तसेच निर्मित वस्तूंच्या किंमती कमी झाल्याने यंदा घाऊक महागाई दराने उसंत दिली आहे. आधीच्या महिन्यात, जून २०१९ मध्ये हा निर्देशांक २.०२ टक्के तर वर्षभरापूर्वी, जुलै २०१८ मध्ये तो ५.२७ टक्के होता. यापूर्वीचा किमान घाऊक महागाई दर जून २०१७ मध्ये ०.९ टक्के नोंदला गेला आहे. गेल्या महिन्यातील कमी होणारा किरकोळ महागाई दर मंगळवारीच स्पष्ट झाला.

First Published on August 15, 2019 2:42 am

Web Title: in july the trade deficit plummeted to a four month low zws 70
Just Now!
X