मुंबई : भरघोस निर्देशांक वाढीचा लाभ गेल्या तिमाहीत मल्टी कॅप फंडांना झाल्याचे फंड गटातील परताव्यावरून दिसून येत आहे. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत फंडांची चमकदार कामगिरी झाली आहे.

मल्टी कॅप फंड गटात ३३ फंड असून या फंडांनी मागील तिमाहीत सरासरी १२ टक्के  परतावा दिला आहे. मागील तिमाहीत सर्वच फंडाच्या नकारात्मक परताव्याच्या तुलनेत या गटातील सर्वच फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे. पराग पारीख लॉंग टर्म इक्विटी फंडाने ३२ टक्के, यूटीआय इक्विटी फंडाने २२.९६ टक्के डीएसपी इक्विटी फंडाने २२.३७ टक्के परतावा दिला आहे.

सॅमको रॅक एमएफचे प्रमुख ओंकेश्वर सिंग यांनी सांगितले की, मागील तिमाहीत जगभरातील भांडवली बाजारांनी असाधारण अस्थिरता अनुभवली. भारतीय बाजारही याला अपवाद नव्हते. आमच्या मंचावर शिफारस केलेल्या मल्टी कॅप फंडाची कामगिरी चमकदार असली तरी दीर्घ कालावधीत चांगले फंड १२ ते १४ टक्के वार्षिक परतावा देतील. गुंतवणूकदारांनी भविष्यातील अस्थिरता लक्षात घेऊन एक रकमी गुंतवणूक न करता एसआयपी किंवा एसटीपीच्या माध्यमातून गुंतवणूक करावी, असा सल्लाही ते गुंतवणूकदारांना देतात.