मुंबई : खासगी क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सने आज ‘इन्कम प्रोटेक्ट प्लान’ नावाची नवीन योजना आणली आहे. ग्राहकाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवणाऱ्या गरजा लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे.  ही एक टर्म इन्श्युरन्स अर्थात शुद्ध मुदतीचा विमा योजना असून वर्षांगणिक तिच्या  विमा कवचात टक्कय़ांची वाढ होत जाते.

ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार केली असल्याचे आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे उत्पादन विभागाचे प्रमुख कार्तिक रमन यांनी सांगितले. जीवनात वाढलेल्या अनिश्चितता आणि अचानक दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागण्याचे प्रसंग पाहता, आर्थिक सुरक्षा ही आजच्या काळात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. या पाश्र्वभूमीवर लोकांना आर्थिक नियोजनासाठी प्रेरित करण्याकरिता ही योजना राबविण्याचे निश्चित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही आपतकालीन स्थितीत विमाधारकांच्या जिवलगांच्या गरजांसाठी मासिक उत्पन्न पुरविण्याचा मार्ग ही योजना प्रदान करते, असे त्यांनी सांगितले.

योजनेत १० ते ३० वर्षे या दरम्यान पॉलिसीचा मुदत कालावधी निवडता येतो आणि हप्ते भरण्याचा कालावधी सोयीनुसार १०, १५ किंवा २० वर्षांचा निवडता येतो. पॉलिसी काळात विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, त्वरित खर्चाचा भार उचलण्यासाठी ठरावीक रक्कम आणि नियमित खर्चासाठी मासिक उत्पन्न वारसांना  दिले जाते.