कर परतावा विवरणपत्र (आयटी रिटर्न्स) सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे करदात्यांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ सोमवारी क्रॅश झाले. व्यवसाय किंवा धंदेवाईक उत्पन्न नसलेल्या प्रत्येक नोकरदार वर्गाने आपले विवरणपत्र आयटीआर-१ किंवा आयटीआर-२ अंतर्गत आयकर विभागाकडे दरवर्षी सादर करणे अपेक्षित असते. यंदाच्या वर्षाचे विवरणपत्र सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या http://www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे संकेतस्थळावर ताण निर्माण झाला आणि ते बंद पडले.