26 January 2021

News Flash

‘एनपीएस’, ‘अटल पेन्शन’मधील गंगाजळीत वाढ

वार्षिक तुलनेत त्यात ३६.८३ टक्के वाढ नोंदली गेली आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

राष्ट्रीय निवृत्ती वेतन पद्धती (एनपीएस), अटल निवृत्ती वेतन योजना (एपीवाय) सारख्या सरकारी सामाजिक सुरक्षा योजना अखत्यारीतील व्यवस्थापन मालमत्ता डिसेंबर २०२० अखेर ५.४९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

वार्षिक तुलनेत त्यात ३६.८३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिसेंबर २०१९ अखेर या योजनांमधील एकूण मालमत्ता ४.०१ लाख कोटी रुपये होती. एनपीएस तसेच एपीवायचे सदस्य ३१ डिसेंबर २०२० अखेर ३.९७ कोटी झाले आहेत. डिसेंबर २०१९ मधील ३.२६ कोटी सदस्यांच्या तुलनेत त्यात यंदा २१.६७ टक्के वाढ झाली आहे.सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘एनपीएस’ योजनेचा लाभ नंतर खासगी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच अन्य जनतेकरिता उपलब्ध झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:10 am

Web Title: increase in nps atal pension abn 97
Next Stories
1 ..हा तर आर्थिक स्थैर्यालाच धोका – गव्हर्नर दास
2 महागाईचा दिलासा
3 त्रिवार विक्रम!
Just Now!
X