देशातील तेलबिया उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित होणाऱ्या तेलाचे त्यातील पोषण घटकांप्रमाणे ब्रँिडग करून ग्राहकांच्या गरजेनुसार विक्रीसाठी उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना तेलबियाच्या भावात दुपटीने वाढ देणे सहज शक्य आहे. तेलबिया उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला तर सात हजार कोटी रुपये परकीय चलन वाचेल व हा पसा अन्य विकासाच्या कामावर खर्च करता येईल.
तेलबियाचे देशातील लागवडीखालील क्षेत्र ३०० लाख हेक्टर आहे. पकी ७५ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे, तर २५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. मोहरी, भुईमूग, जवस, करडई, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, एरंडी व बारीक कारळ या नऊ पिकांपासून तेलाचे उत्पादन होते. ओलिताखालील क्षेत्र वाढवल्यास व तेलबियाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास तेलबिया उत्पादनात देश स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अमेरिका, रशिया, अर्जेटिना या देशांत तेलातील ओलीक अर्थात फॅटी अॅसिडचा योग्य उपयोग करून त्याचे बँ्रिडग केले जाते. सध्याची आरोग्याबाबत दक्षता पाहता, आरोग्यपूरक उच्च दर्जाचे तेल २०० रुपये किलोने खरेदी करण्यासही ग्राहक तयार आहेत. विदेशातील ब्रँडेड तेल भारतात मोठय़ा प्रमाणात खपते.
गेल्या ४० वर्षांपासून विदेशातून पामतेल आणले जाते. पामतेल पोटात असतानाच गर्भ वाढतो व पामतेलातच एक पिढी संपत चालली आहे, त्यामुळेच लहानपणापासून एकच एक तेल खाल्ल्यामुळे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. वैद्यकशास्त्रानुसार विविध तेलांचा वापर जेवणात असला पाहिजे. सद्य:स्थितीत पसे खर्च करायची तयारी असली तरी असे तेल उपलब्ध होत नाही. विदेशातून येणाऱ्या ब्रँडेड तेलाकडे अनेक श्रीमंत मंडळी वळतात. आपल्या देशात तयार होणाऱ्या तेलबियांतून असे उच्च दर्जाचे तेल वर्गीकरण करून विक्रीसाठी उपलब्ध केले पाहिजे.
सूर्यफुलाच्या दोन हजार जाती लातूर येथील गळीत संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत. तेलबियाच्या नवनवीन जातींच्या संशोधनावर काम करणारे देशातील हे एकमेव असे केंद्र असल्याचे या केंद्राचे प्रमुख डॉ. एम. के. घोडके यांनी सांगितले. सूर्यफुलाचे पीक कितीही जोमदार आले तरी त्यात परपराग सिंचन पद्धतीने बी भरते. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्यामुळे व वृक्षतोड वाढल्यामुळे मधमाशांचे प्रमाण कमी होते आहे. पीक कितीही जोमदार आले तरी जोपर्यंत परागसिंचन योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत बी तयार होत नाही. याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो आहे.
निरनिराळय़ा पिकांवर पडणारे रोगही वेगळे आहेत. नवनवीन रोग तयार होत आहेत. बियाणांच्या जातीत रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, विविध जातींतील चांगले गुणधर्म एकत्र करून नवे वाण तयार करण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. भविष्यात संशोधक हे आव्हान पेलतीलही. मात्र या संशोधनाचा लाभ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार नसेल तर या संशोधनाचा उपयोग काय? शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी जगभर प्रयत्न केले जातात. शेतकऱ्याला उत्पादन घेणे परवडावे यासाठी योग्य हमीभाव दिला जातो. त्याला वेळच्या वेळी आíथक साहाय्य केले जाते. आपल्या देशातील शेतीविषयक धोरणे बदलली तर देशातील शेतकरी जगातील दर्जेदार उत्पादन घेऊ शकेल. फक्त गरज आहे ती त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांची.

हिशेब का परवडत नाही?
सूर्यफुलात तेल-घटकाचे प्रमाण २० टक्के, सूर्यफुलात ४० टक्के, तर भुईमुगात ५० ४० टक्के तेलाचे प्रमाण असूनही त्याचा बाजारपेठेत भाव क्विंटलला तीन हजार ते ३,५०० रुपये, तर भुईमुगात ५० टक्के तेलाचे प्रमाण असूनही त्याचा भाव ३,७०० ते ४,००० रुपये क्विंटलच आहे. भुईमुगाचे हेक्टरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल व सूर्यफुलाचे उत्पादनही तितकेच आहे. ही उत्पादकता आणि मिळणाऱ्या बाजारभावाचा हिशेब घातल्यास शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळेच शेतकरी तेलबियाचे उत्पादन घेण्यास धजावत नाही.