बँका, माहिती-तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी आल्याने भांडवली बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांनी उसळी दर्शविली.

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हची धोरण ठरविणारी बैठक सुरू असून, रोखे खरेदीत वाढ करण्याचा अपेक्षित निर्णयाच्या आशावादाने स्थानिक बाजारात समभाग खरेदीला बुधवारी जोर चढलेला दिसून आला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स २८५.५० अंश कमावून दिवसअखेर ३९,३०२.८५ या पातळीवर स्थिरावला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने ८२.७५ अंशांची भर घालत ११,६०४.५५ पुढे मजल मारली. मात्र मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकांच्या मुसंडीला बुधवारी किंचित ब्रेक लागल्याचे दिसून आले.