08 August 2020

News Flash

औद्योगिक उत्पादन सप्टेंबरमध्ये सुधारले

वर्षभरापूर्वी तसेच महिन्यापूर्वी शून्यात राहिलेल्या देशातील औद्योगिक उत्पादनाने सप्टेंबरमध्ये किरकोळ का होईना वाढ नोंदविली आहे.

| November 13, 2013 01:09 am

वर्षभरापूर्वी तसेच महिन्यापूर्वी शून्यात राहिलेल्या देशातील औद्योगिक उत्पादनाने सप्टेंबरमध्ये किरकोळ का होईना वाढ नोंदविली आहे. ऊर्जा तसेच खनिकर्म क्षेत्रातील वाढीने दोन महिन्यांपूर्वी उत्पादनाचा दर २ टक्के राहिला आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन ०.४३ टक्के होते, तर वर्षभरापूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये हा दर ०.७ टक्के होता. एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्धआर्थिक वर्षांतही हा दर ०.४ टक्के राहिला आहे. एप्रिलमधील १.५ टक्के वाढीनंतर सलग दोन महिने तो उणे स्थितीत नोंदला गेला. जुलैमध्येही हा दर २.८ टक्के होता.
सप्टेंबरमध्ये खनिकर्म क्षेत्रातील वाढ वर्षभराच्या २.२ टक्क्यांच्या तुलनेत ३.३ टक्के राहिली आहे; तर ऊर्जा क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या ३.९ टक्क्यांवरून थेट १२.९ टक्के नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राची वाढही उणे १.६%  स्थितीतून वर येत ०.६ टक्के राहिली आहे. एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात निर्मिती क्षेत्राचा हिस्सा तब्बल ७५ टक्के असतो.
एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान ऊर्जा क्षेत्राची वाढ ५.९ टक्के राहिली; तर याच कालावधीत खनिकर्म क्षेत्राची वाढ उणे १.१ टक्क्यांवरून उणे २.५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2013 1:09 am

Web Title: index of industrial production iip rises 2 pct india inc says not enough
Next Stories
1 बाजाराचा थरकाप; ‘सेन्सेक्स’ची द्विशतकी गटांगळी
2 रुपया घरंगळत ६४ च्या दिशेने
3 मार्क्‍स अ‍ॅण्ड स्पेन्सरची वर्षअखेर आणखी आठ दालने
Just Now!
X