15 October 2019

News Flash

सेवानिवृत्तीच्या तयारीत भारत पहिल्या स्थानावर..

‘एगॉन लाईफ इन्शुरन्स’च्या सर्वेक्षणातून भारतीयांचा कल सिद्ध

‘एगॉन लाईफ इन्शुरन्स’च्या सर्वेक्षणातून भारतीयांचा कल सिद्ध

मुंबई : निवृत्तीकरिता तयारी करणाऱ्या १५ देशांच्या यादीत भारत अग्रभागी असून आहे. त्याने याबाबतच्या निर्देशांकात ७.३ टक्क्यांहून अधिक गुणांकन मिळविले आहे.

‘एगॉन लाईफ इन्शुरन्स’ या भारतातील डिजिटल इन्शुरन्सच्या संस्थापक कंपनीच्या वतीने सातव्या वार्षिक एगॉन निवृत्तीसज्ज सर्वेक्षणाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या सर्वेक्षणातील ‘एगॉन रिटायरमेंट रेडिनेस इंडेक्स’ (एआरआरआय) मध्ये ७.३ हून अधिक गुणांकन मिळविण्यात आले आहे.

सर्वेक्षणात सर्वसाधारण लोकसंख्या दर्शविण्यात आली नसून आणि त्यात शहरांमधील मध्यम व उच्च उत्पन्न असलेल्या संघटीत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अहवालात कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या तयारीचे मुल्यांकन करण्यात आले असून निवृत्तीकरिता असलेल्या अपेक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या सुधारणांचा तपास करण्यास सा मिळते, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे आर्थिक नियोजनातील वास्तविक आरोग्याच्या वाढत्या महत्त्वाचा शोध घेतला जातो तसेच पहिल्यांदाच अहवालात आर्थिक साक्षरता तसेच सन्मानाने वृद्धत्वाकडे जाण्याच्या मुद्यांची पडताळणी करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

एगॉन लाईफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत अरोरा यांनी याबाबत सांगितले की, यंदाच्या वर्षीच्या कंपनीच्या सर्वेक्षणात समाविष्ट सर्वच देशांपैकी केवळ भारतीय आगामी १२ महिन्यांतील देशाच्या अर्थकारणाविषयी अधिक सकारात्मक असल्याचे दिसून आले. इतर देशांच्या मानाने केवळ भारतीयच मोठय़ा प्रमाणावर त्यांच्या निवृत्तीकरिता स्वबचत करत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

अरोरा म्हणाले की, भारतातील एकसुरी प्रकारच्या कुटुंबांमध्ये मुले मोठी होताना शिक्षण आणि त्यांच्या नात्यांचा फार विचार केला जातो. मात्र निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार तितक्या काळजीने करण्याची पद्धत नाही. निवृत्तीचे नियोजन लवकर केल्याने संपत्ती संचयनाची एक चांगली सुरुवात ठरते. एकरक्कम जमा होणे वेळकाढू असल्याने निधी जमा करण्याच्या दृष्टीने आणि वाढीचे व्याज दर जमा करण्याच्या हिशेबाने ठरावीक काळात निधीचा परतावा मिळविण्याकरिता ते आवश्यक ठरते. अलीकडे सरासरी आयुर्मान वाढले असल्याने आणि कुटुंब विभक्त होत असल्याने व्यक्ती, कुटुंब, कर्मचारी आणि सरकार व सामाजिक करार याविषयी फेरविचार करण्याची ही वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

एआरआरआय सव्‍‌र्हे म्हणजे सहा प्रश्नांचे फलित आहे झ्र् त्यातील तीन प्रश्न हे विस्तृतपणे वृत्तीशी तर तीन बृहदपणे निसर्गातील वागणुकीशी संबंधित आहेत. यामागचा उद्देश सहभागीदारांचे वैयक्तिक जबाबदारीशी निगडीत जाणिवा, जागरुकताविषयक स्तर, वित्तीय समज, निवृत्ती नियोजन आणि उत्पन्न बदल मोजण्याचा होता.

First Published on April 20, 2019 3:17 am

Web Title: india at first in 15 countries that are preparing for the retirement age