News Flash

भारताच्या उद्वाहन बाजारपेठेची १५ टक्के दराने वाढ अपेक्षित

जगातील दुसरी मोठी उद्वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतात वार्षिक १५ टक्के दराने विकास अपेक्षित आहे.

वेगाने शहरीकरण सुरू असलेली अनेकानेक राज्ये आणि देशभरात १०० स्मार्ट शहरांच्या विकासाची सरकारपुरस्कृत योजना पाहता, जगातील दुसरी मोठी उद्वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतात वार्षिक १५ टक्के दराने विकास अपेक्षित आहे.
भारतात आधीच्या १२ वर्षांत १३.३ टक्के विकास दराने दरसाल १८००० उद्वाहनांना मागणी नोंदविली जात असल्याचे आढळून आले आहे. २०१८ सालात भारतात स्थापित वेगवान उद्वाहन संचांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार करणे अपेक्षित आहे. या उद्योगक्षेत्रातील तसेच सरकत्या स्वयंचलित जिन्यांच्या क्षेत्रातील भारतातील आगामी संधींचा वेध घेण्यासाठी सहावे ‘आयईईई’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन येत्या १७ मार्च ते १९ मार्च २०१६ दरम्यान मुंबईच्या यजमानपदाखाली होत आहे.
गोरेगाव पूर्व येथील मुंबई प्रदर्शन संकुलातील या प्रदर्शनाचे उद्घाटन १७ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. जगभरात उद्वाहने व सरकत्या जिन्यांच्या निर्मितीतील अग्रणी कंपन्या, बांधकाम विकासक, वास्तुविशारद आणि अन्य सहभागींची उपस्थिती अपेक्षित आहे.

 

आज सराफ मोर्चा
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अर्थसंकल्पातून नव्याने लादण्यात आलेल्या उत्पादन शुल्काविरोधात गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या आंदोलनाला उग्र रूप देताना, सोने व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोशिएशन (आयबीजेए)’ने बुधवारी ९ मार्चला सकाळी ११ वाजता मुंबईत आझाद मैदान येथे मोर्चाची हाक दिली आहे. देशातील पाच लाख सराफांचा व्यवसाय आणि त्यांचे ४० लाख कारागिरांच्या रोजीरोटीला मारक ठरणारी उत्पादन शुल्काची तरतूद मागे घेण्याची मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत बंद सुरू ठेवण्याची आयबीजेएने हाक दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 4:06 am

Web Title: india elevator market
Next Stories
1 दंतोपचाराला आता बजाज फायनान्सकडून कर्जसाहाय्य
2 मल्याप्रकरणी सुब्रह्मण्यन यांचा व्यवस्थेलाच दोष
3 सिंडिकेट बँकेवर छापे
Just Now!
X