02 March 2021

News Flash

तिमाही विकासदर ४.७ टक्के, सात वर्षांच्या नीचांकाला!

विद्यमान संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ५ टक्के विकास दराचा पूर्वअंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

| February 29, 2020 03:05 am

नवी दिल्ली : रोडावलेल्या निर्मिती क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात वर्षांपूर्वीच्या नीचांकपदाला पोहोचला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ४.७ टक्के राहिल्याचे शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.

यापूर्वीचा ४.३ टक्के असा किमानतम विकासदर जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीदरम्यान होता. तर या आधीच्या जुलै ते सप्टेंबर २०१९ तिमाहीत तो ४.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, याच ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीदरम्यान तो ५.६ टक्के असा होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही  तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर करताना चालू आर्थिक वर्षांतील यापूर्वीच्या दोन तिमाहीतील विकास दर सुधारून जाहीर केला आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून २०१९ दरम्यान तो ५ टक्क्यांऐवजी ५.६ टक्के तर जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान तो ४.५ टक्क्यांऐवजी ५.१ टक्के असा होता, असे नमूद करण्यात आले आहे.

विद्यमान संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ५ टक्के विकास दराचा पूर्वअंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने कायम ठेवला असून, या कार्यालयाचा हा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजाच्या समकक्षच आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०१९ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यात सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाणही वर्षभरापूर्वीच्या ६.३ टक्क्यांवरून कमी होत ५.१ टक्क्यांवर आले आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत शून्यावर (०.२ टक्के) येऊन ठेपला आहे. वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ मध्ये त्याचा ५.२ टक्के दराने विस्तार झाला होता.

गेल्या तिमाहीत कृषी क्षेत्राची वाढ ३.५ टक्के झाली आहे. यात वार्षिक तुलनेत, २ टक्क्यांच्या तुलनेत यंदा वाढ नोंदली गेली आहे.

बांधकाम क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या ३.२ टक्क्यांवरून थेट ०.३ टक्क्यावर येऊन ठेपले आहे.

पोलाद क्षेत्राची वाढदेखील कमी होत ४.४ टक्क्यांवरून यंदा ३.२ टक्क्यांवर आली आहे.  ऊर्जा, वायू, जल पुरवठा तसेच अन्य बहुपयोगी सेवा गटाचा प्रवास गेल्या तिमाहीत ०.७ टक्के नोंदला गेला आहे.

आगामी काळ उभारीचाच!

अर्थवृद्धीदर सात वर्षांच्या तळात पोहोचला असला तरी देश आर्थिक मंदीतून बाहेर आल्याचे हे लक्षण आहे, असे वक्तव्य केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव अतनू चक्रबर्ती यांनी शुक्रवारी केले. भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वीच तिचा तळ गाठला आहे आणि यापुढे उभारीचेच संकेत दिसून येतात. गेल्या दोन महिन्यातील निर्मिती क्षेत्राच्या वाढीमुळे या उभारीला प्रोत्साहन मिळाले आहे. हे क्षेत्र यापुढेही वाढीचा क्रम दर्शवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:05 am

Web Title: india gdp growth at 4 7 percent in third quarter zws 70
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : विषाणू बाधा
2 प्रमुख पायाभूत क्षेत्रात वर्षांरंभी वाढ
3 सोने तारण कर्ज : आवश्यक खबरदारी
Just Now!
X