जीनिव्हा : जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत १० अंकांनी घसरला असून त्याचा ६८वा क्रमांक लागला आहे. सिंगापूरने जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून स्थान असलेल्या अमेरिकेला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.

गेल्या वर्षी भारताचा क्रमांक जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात ५८वा होता. इतर देशांच्या क्रमवारीत सुधारणेमुळे यंदा भारत ६८व्या क्रमांकावर फेकला गेल्याचे जीनिव्हा येथील जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या स्पर्धात्मकता निर्देशांक दर्शवितो. ‘ब्रिक्स’च्या तत्सम निर्देशांकातही भारत या वर्षी खालच्या क्रमांकावर होता.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक
IPL 2024 : सर्वांच्या सहमतीनेच निर्णय! सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून हार्दिकची पोलार्डकडून पाठराखण

जागतिक आर्थिक मंचाने बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतात विशेषकरून बँकिंग व्यवस्था फारच कमकुवत झालेली दिसून येते, असे आवर्जून नमूद केले आहे.

अपेक्षित आयुर्मानात भारत १४१ देशांत १०९व्या क्रमांकावर असून त्याची कामगिरी दक्षिण आशियाच्या सरासरी कामगिरीच्याही खाली आहे. एकूण क्रमवारीत भारताच्या खाली श्रीलंका (८४), बांगलादेश (१०५), नेपाळ (१०८), पाकिस्तान (११०) हे शेजारील देश आहेत.

देशांतर्गत स्थूल आर्थिक स्थिरता, बाजारपेठेचे आकारमान, सखोल वित्तीय क्षेत्र हे भारताचे जमेचे घटक आहेत. उद्यम सुशासनात भारताचा १५वा क्रमांक लागला असून भागधारक प्रशासनात तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत बाजारपेठ आकारमानात भारत तिसऱ्या क्रमांकावर असून अक्षय्य ऊर्जा नियमनात भारताचा तिसरा क्रमांक आहे.

नवप्रवर्तनात भारत प्रगत अर्थव्यवस्थांच्या बरोबरीने आहे, असे जागतिक आर्थिक मंचाने स्पष्ट केले आहे.