08 March 2021

News Flash

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सातव्या स्थानावर घसरण

ब्रिटन आणि फ्रान्सच्याही आधी जपान आणि जर्मनीचा क्रम आहे.

न्यूयॉर्क : येत्या पाच वर्षांत ५ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य निश्चित केलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र सातव्या क्रमांकापर्यंत घसरले आहे. याआधी भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी होती.

भारतीय अर्थव्यवस्था वर्षभरात २.६५ लाख कोटी डॉलरवरून २.७२ लाख कोटी डॉलपर्यंत वाढली असली तरी २०१८ मध्ये ती ब्रिटन आणि फ्रान्सच्या  तुलनेत मागे पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकी चलनातील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वी ब्रिटनला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले होते. मात्र गेल्या वर्षांत ब्रिटनसह फ्रान्सने भारताला मागे टाकले आहे.

जागतिक बँकेच्या क्रमवारीनुसार, अमेरिका २०.४९ लाख कोटी डॉलरसह जगातील अव्वल अर्थव्यवस्था ठरली आहे. तर १३.६० लाख कोटी डॉलरसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रिटन आणि फ्रान्सच्याही आधी जपान आणि जर्मनीचा क्रम आहे.

नाईक, पारेखांची टीका

संथ अर्थव्यवस्थेबाबत आघाडीच्या उद्योजकांचा आवाज तीव्र होत असून लार्सन अँड टुब्रोचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष ए. एम. नाईक यांच्या पाठोपाठ एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली आहे.

संथ अर्थव्यवस्थेतील खासगी क्षेत्रापुढे सध्या मोठे आव्हान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे काम केले तसे कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ए. एम. नाईक यांनी केले आहे. तर देशातील बँकेतर वित्त कंपन्या, गृह वित्त कंपन्यांना निधी चणचणीचा सामना करावा लागत असल्याचे दीपक पारेख यांनी नमूद केले आहे.

विद्यमान स्थितीत वार्षिक ६.५ टक्के विकास दर असला तरी खूप, अशा शब्दांतही नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मार्च २०१९ अखेर संपलेल्या वित्त वर्षांतील ६.९ टक्के विकास दर संथ अर्थव्यवस्थेतून प्रतिबिंबित झाला आहे, असे पारेख यांनी म्हटले आहे.

संथ अर्थव्यवस्थेबाबत यापूर्वी आदि गोदरेज, राहुल बजाज आदी उद्योगपतींनी मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:33 am

Web Title: india slips to seventh position in global economy zws 70
Next Stories
1 तिमाहीत २१३ टन सोने आयात
2 वाहन विक्रीत घसरण!
3 ‘सीसीडी’चा कर्जभार ५,२०० कोटींवर; प्रवर्तकांचे ७६ टक्के समभाग गहाणवट
Just Now!
X