इंडिया बुल्स अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने पर्यायी गुंतवणूक क्षेत्रात (एआयएफ) देशातील पहिला रिअल इस्टेट फंड प्रस्तुत केला आहे. देशातील पाच बड्या महानगरांमधील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या उद्दिष्टासह दाखल झालेल्या या फंडाला केअर रेटिंग्जकडून एएए पतनिर्धारण प्राप्त झाले आहे.
सेबीने पर्यायी गुंतवणूक क्षेत्र (एआयएफ) संबंधाने जाहीर केलेल्या नियमनांनुसार, भारतीय व परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी उभारणारा स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी खुला झालेला हा पहिलाच फंड आहे. इंडियाबुल्स रिअल इस्टेट फंडाचे प्रस्तावित मूल्य हे ५०० कोटी रुपयांचे असून, अतिरिक्त ५०० कोटी रुपये उभारण्याचा पर्यायही त्याला उपलब्ध आहे. सरासरी तीन वष्रे कालावधीसाठी प्रथितयश व अल्प जोखीम असणारया प्रकल्पांमध्ये या फंडातून गुंतवणूक करण्यात येणार आहे. तिमाही तत्त्वावर नियमित परतावे देणारया संपूर्ण सुरक्षित अपरिवर्तनीय रोख्यांसारखी या फंडाची रचना असेल. या फंडाची पुरस्कर्ती असलेल्या इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने नुकतीच आपल्या पर्यायी गुंतवणूक निधी निधी व्यवसायाची सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने अंबर माहेश्वरी यांच्यावर सोपविली आहे. माहेश्वरी हे स्थावर मालमत्ता स्लागार कंपनी जोन्स लँग लासालमध्ये कॉर्पोरेट फायनान्स विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून या आधी काम पाहत होते.