News Flash

अर्थवृद्धीतील मरगळ पाच टक्क्य़ांखालील तळाकडे!

नोमुराने या सर्व कयासांमध्ये अर्थव्यवस्थेत वाढीचा सर्वात कमी म्हणजे ४.२ टक्के दराचे अनुमान केले आहे.

आज आकडेवारी अपेक्षित, निराशादायी कयासांवर मात्र बहुतांश सहमती

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था तीन दशकांपूर्वी अनुभवास आलेल्या ५ टक्क्य़ांखालील विकासदराच्या दिशेने घरंगळताना दिसेल, याबाबत बहुतांश अर्थविश्लेषक आणि पतमानांकन संस्थांचे एकमत झालेले दिसून येत आहे. प्रत्यक्षात शुक्रवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीतील वाढीच्या आकडेवारीवरून नेमके चित्र स्पष्ट होईल.

नोमुरा, इक्रा, कॅपिटल इकॉनॉमिक्स, स्टेट बँकेचा आर्थिक संशोधन विभाग, इंडिया रेटिंग्ज अशा देशी-विदेशी अर्थविश्लेषक संस्थांनी गेल्या काही दिवसांमध्ये जुलै-सप्टेंबर २०१९ तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर किमान ४.२ टक्के ते कमाल ४.७ टक्क्य़ांदरम्यान राहण्याचे अर्थात ५ टक्क्य़ांखालील विकासदराचे कयास मांडणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. ही अर्थवृद्धीदरातील सलग सहाव्या तिमाहीत झालेली घसरण ठरेल. आधीच्या जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ५ टक्के असा सहाव्या वर्षांतील नीचांकी पातळीवर नोंदला गेला आहे.

नोमुराने या सर्व कयासांमध्ये अर्थव्यवस्थेत वाढीचा सर्वात कमी म्हणजे ४.२ टक्के दराचे अनुमान केले आहे. तर बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने कयास सर्वापेक्षा अधिक ५.८ टक्क्य़ांचा आहे. नोमुराचे ४.२ टक्क्य़ांचे भाकीत खरे ठरल्यास, तो जीडीपीसंबंधी आकडेवारीसाठी २०१२ हे आधारभूत वर्ष निर्धारीत करण्यात आल्यानंतर सर्वात अल्पतम वाढीचा दर असेल. उल्लेखनीय म्हणजे नोमुराच्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा यांनी, एप्रिल-जूनमध्ये नोंदविला गेलेला ५ टक्क्य़ांचा वृद्धीदर हा नीचांक असल्याचे आपण मानत नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले होते.

केंद्रातील सरकारने गेल्या काही महिन्यांत अर्थवृद्धीला प्रोत्साहन म्हणून, विशेषत: अर्थव्यवस्थेत मागणीला चालना देणाऱ्या अनेकांगी घोषणा सुरू केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:26 am

Web Title: indian economic growth expected to have declined below 5 percent zws 70
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टीचा ऐतिहासिक टप्पा
2 ‘रिलायन्स’चा १० लाख कोटींच्या बाजार भांडवलाचा ऐतिहासिक टप्पा
3 अडचणीतील २५ बँकेतर वित्तीय कंपन्यांना रिझव्‍‌र्ह बँकेने अभयदान द्यावे – केंद्र सरकार
Just Now!
X