News Flash

वर्षांरंभीच महागाईचा सहा वर्षांचा उच्चांक

भाज्याच्या किमतीत थेट ५० टक्क्यांनी वाढ

| February 13, 2020 03:57 am

वर्षांरंभीच महागाईचा सहा वर्षांचा उच्चांक
संग्रहित छायाचित्र

भाज्याच्या किमतीत थेट ५० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : चालू वर्षांच्या सुरुवातीलाच महागाई दर गेल्या सहा वर्षांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे जानेवारी २०२० मधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ७.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यापूर्वी मे २०१४ मध्ये महागाई दर ८.३३ टक्के अशा वरच्या टप्प्यावर होता. महागाई निर्देशांकातील अन्नधान्याच्या गटवारीतील महागाई दर १३.६३ टक्के आहे. भाज्या, डाळी तसेच मांसाहारी पदार्थाच्या किमतींचा भार महागाई निर्देशांकावर पडला आहे. वर्षभरापूर्वी अन्नधान्याच्या महागाईचा दर उणे स्थितीत होता. तर भाज्यांच्या किमती यंदाच्या जानेवारीत थेट ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळींचे दर १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थही दुहेरी अंकापर्यंत वाढले आहेत.

एकूण महागाई निर्देशांकातील अन्नधान्याची किंमतवाढ लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ५०.१९ टक्क्यांनी तर डाळींचे दर १६.७१ टक्क्यांनी वाढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 3:57 am

Web Title: indian inflation hit a near six year high in january zws 70
Next Stories
1 सहाराच्या स्थावर मालमत्ता व्यवसायात विदेशी गुंतवणूकदारांना स्वारस्य
2 तीन सरकारी विमा कंपन्यांना २५०० कोटींचे आर्थिक बळ
3 सेन्सेक्समध्ये ३५० अंशांची उसळी; निफ्टी १२,२०० पुढे
Just Now!
X