News Flash

करोना संकटकाळातही ‘ही’ कंपनी करणार १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती

जून तिमाहितही कंपनीला झाला होता नफा

सध्या देशात आणि जगभरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांचं अर्थचक्र थांबलं आहे. भारतही त्याला अपवाद नाही. परंतु करोनासारख्या संकटकाळातही एचसीएल टेक्नॉलॉजीनं १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीनं ९ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यावरून कंपनीची स्थिती चांगली असून त्यांच्याकडे सध्या उत्तम प्रोजेक्ट्सही असल्याचं दिसून येत आहे.

१७ जून रोजी एचसीएल टेक्नॉलॉजीनं आपला तिमाहिचा रिझल्ट जाहीर केला होता. जून तिमाहित कंपनीचा नफा ३१.७० टक्क्यांनी वाढून तो २ हजार ९२५ कोटी रूपये झाला होता. कंपनीला गेल्या वर्षी याच तिमाहित २ हजार २२० कोटी रूपयांचा नफा झाला होता. तर दुसरीकडे यानंतर कंपनीचे शेअर्सनंही ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

एचसीएलमध्ये महिला नेतृत्व

एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मलहोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८.९ अब्ज डॉलरच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध तंत्रज्ञान कं पनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जाधीश, तरुण उद्योजक, महिला व्यावसायिकांच्या यादीत त्यांची अव्वल म्हणून नोंद झाली आहे. कंपनीतील पद व नेतृत्वबदलाची माहिती शुक्रवारी भांडवली बाजारालाही देण्यात आली आहे.

युवाध्यक्षा!

प्रसार माध्यमांमध्ये विशेष रुची असलेल्या शिव यांच्या कन्या रोशनी या एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या संचालक मंडळात सर्वप्रथम २०१३ मध्ये रुजू झाल्या. येथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिकाही बजाविली. एचसीएल समूहात येण्यापूर्वी त्यांनी सीएनएनसारख्या इंग्रजी वाहिन्यांमध्ये वृत्त निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली. एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाची माळ त्यांच्या गळ्यात वयाच्या २७ व्या वर्षीच पडली. ४० च्या आतील युवा उद्योजक म्हणून त्या फोर्ब्ससारख्या यादीत त्या झळकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 6:21 pm

Web Title: indian information technology company hcl will hire 15000 employees this year big projects and profit jud 87
Next Stories
1 राहुल बजाज यांचा बजाज फायनान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
2 लस-आशावादाने ‘सेन्सेक्स’ची ५११ अंश झेप
3 म्युच्युअल फंड गुंतवणूकदार खात्यांच्या संख्येत ९ टक्के वाढ
Just Now!
X