24 November 2017

News Flash

भारतीय औषधांची निर्यात २५ अब्ज डॉलपर्यंत!

२०११ साली पेटंट सुरक्षा गमावणाऱ्या औषधांचा एकूण उलाढाल २७० अब्ज अमेरिकी डॉलर होता. ही

व्यापार प्रतिनिधी मुंबई | Updated: November 28, 2012 10:05 AM

२०११ साली पेटंट सुरक्षा गमावणाऱ्या औषधांचा एकूण उलाढाल २७० अब्ज अमेरिकी डॉलर होता. ही उलाढालही २०१६ पर्यंत ४३० अब्ज अमेरिकन डॉलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतीय औषध क्षेत्राने जेनेरिक व एपीआय निर्यातींमध्ये बरीच मजल मारली आहे; पारंपारिक औषध निर्यातीमध्ये मजबूत पकड कायम ठेवण्याकरिता त्याचे प्रयत्न सुरु असल्यामुळे २०१४-१५ च्या अखेपर्यंत भारतातून २५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या औषधांची निर्यात होण्याची शक्यता केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक सचिव राजीव खेर यांनी मुंबईमध्ये व्यक्त केली. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाचे सर्वात मोठे औषधी उद्योगाचा मेळावा ‘सीपीएचआय व एमईसी इंडिया’मध्ये सांगितले.
खेर म्हणाले की, भारतीय औषध उद्योगामध्ये बायो फार्मास्युटिकल्सचा आधारदेखील जलदतेने वाढत आहे. ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जगभरामध्ये जेनेरिक औषधांचा बाजार जलदतेने विकसित होत आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय औषधी उद्योग पुढील दशकामध्ये स्वाभाविकपणे अग्रगण्य स्थानावर पोहोचेल असे वाटते.
खेर यांनी त्सांगितले की, जागतिक वित्तीय अरिष्ट असूनही भारतीय फार्मा उद्योग मजबूत वाढीच्या लक्ष्यासह प्रगतीपथावर अग्रेसर आहे. अधिकाधिक लोकांकडून विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याची संभाव्यता पाहता आरोग्यविम्याविषयी असो किंवा आरोग्यनिगा उद्योगाद्वारे जागतिक स्तरावरील सुविधा सादर करणे असो, राष्ट्रीय उद्योग जलदतेने विकसित होत आहे.
या स्पर्धात्मक गुणवत्तेविषयी ते म्हणाले की, ‘औषध उद्योगामध्ये बरेच निपुण व प्रशिक्षित व्यावसायिक उपस्थित आहेत. तसेच येथे कारभाराचे मूल्यदेखील कमी आहे. याबरोबरच सकारात्मक धोरणे व सुविधा याद्वारे उद्योग भविष्यातील आव्हाने पूर्ण करूशकेल. उद्योगामध्ये कॉन्ट्रक्ट रिसर्च व कॉन्ट्रक्ट मॅन्युफॅक्चिरग यासारख्या अधिक चांगल्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. जपान, स्पेन, चीन व सीआयएस यांसारख्या देशांमध्ये जेनेरिक बाजार खुलण्याची आशाही वर्तविण्यात येत आहे.’
भारतीय औषध उद्योगाच्या आव्हानांमध्ये बनावट औषधांकरिता ‘ईयू’चे नवीन निर्देश, यूएसएफडीएच्या कारभाराचे वाढते मूल्य व चीनच्या विना टॅरिफ अडथळ्यांचा समावेश आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्च २०१२ मध्ये जपान मध्ये सीपीएचआयच्या दरम्यान दाखल करण्यात आलेल्या ब्रँड इंडिया फार्मा कॅम्पेनला सरकारद्वारे पुढे चालविण्यात येईल. सीपीएचआय दक्षिण-पूर्व एशिया व माद्रिदमध्ये सीपीएचआय वर्ल्डवाईड मधील ब्रँड इंडिया फार्मा कॅम्पेनला भारतीय उद्योगाच्या क्षमता दर्शवित पुढे वाढविण्यात आले होते.  
गोरेगावमधील बॉम्बे एक्झीबिशन सेंटरमध्ये सुमारे ५५,००० चौरस मीटर क्षेत्रामध्ये विस्तारलेले या तीन दिवसीय प्रदर्शनात, २१ देशांमधून विक्रमी ९२६ प्रदर्शनकर्ते सामील झाले आहे. यूबीएम इंडियाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्याकरिता ११८ देशांमधून भेट देणाऱ्या प्रतिनिधींची यापूर्वीच नोंदणी करण्यात आली आहे.  

First Published on November 28, 2012 10:05 am

Web Title: indian medicaine exports upto 25 thousand millions dollar