News Flash

१३ महिन्यांच्या तळातून रुपया उंचावला

डॉलरच्या तुलनेत गेल्या १३ महिन्यांच्या नीचांकात गेलेला रुपया मंगळवारी सावरला. सलग पाच व्यवहारांत प्रथमच २९ पैशांनी उंचावताना स्थानिक चलन ६३.३८ वर पोहोचले.

| December 31, 2014 01:01 am

डॉलरच्या तुलनेत गेल्या १३ महिन्यांच्या नीचांकात गेलेला रुपया मंगळवारी सावरला. सलग पाच व्यवहारांत प्रथमच २९ पैशांनी उंचावताना स्थानिक चलन ६३.३८ वर पोहोचले. स्थानिक रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी निधी ओतल्याने तसेच आयातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपया भक्कम होऊ शकला. चलन व्यासपीठावर रुपयाची सुरुवात ६३.७२ अशी नरमाईनेच सुरू झाली. सत्रात चलन ६३.७९ पर्यंत घसरले. डॉलर विक्रीने रुपया व्यवहारात ६३.३५ पर्यंत झेपावला. गेल्या चार व्यवहारांत रुपया ४७ पैशांनी घसरला आहे.
कच्चे तेल पुन्हा पंचवार्षिक नीचांकाला
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांच्या नीचांक पातळीवर आले आहेत. कच्च्या तेलाचे फेब्रुवारीमधील व्यवहार हे ६० डॉलर प्रतिपिंपाच्याही खाली नोंदले गेले आहेत. सिंगापूरच्या बाजारात सकाळच्या व्यवहारात कच्च्या तेलाचे व्यवहार ५७ डॉलर प्रतिपिंपने होत होते. २०१४ च्या मध्यान्हाला १४० डॉलरवरून वर्षअखेरीस निम्म्याच्याही खाली कच्च्या तेलाच्या दरांचा प्रवास आला आहे. काळ्या सोन्याची ही दरपातळी मे २००९ च्या समकक्ष पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2014 1:01 am

Web Title: indian rupee sinks to 13 month low against us dollar
टॅग : Us Dollar
Next Stories
1 व्यापारांच्या मार्गातील अडथळे दूर करणार
2 सप्ताहारंभ दीडशे अंश वाढीने
3 हवाई क्षेत्राचे अखेर्पयच हेलकावेच..
Just Now!
X