News Flash

रुपया चारमाही उच्चांक; प्रति डॉलर ” ६१.०४ सलग पाच व्यवहारात १३३ पैशांनी भक्कम

अमेरिकी डॉलरच्या समोर रुपयातील भक्कमता सलग पाचव्या व्यवहारातही कायम राहिली. ९ पैशांच्या वधारणेमुळे स्थानिक चलन मंगळवारी ६१.०४ पर्यंत उंचावले. परिणामी चलन आता गेल्या चार महिन्याच्या

| December 11, 2013 08:29 am

अमेरिकी डॉलरच्या समोर रुपयातील भक्कमता सलग पाचव्या व्यवहारातही कायम राहिली. ९ पैशांच्या वधारणेमुळे स्थानिक चलन मंगळवारी ६१.०४ पर्यंत उंचावले. परिणामी चलन आता गेल्या चार महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहे.
चलनाने सोमवारी ऐतिहासिक भांडवली बाजाराला साथ देत व्यवहारात चार महिन्याचा तर दिवसअखेर दोन महिन्यांच्या उच्चांक राखला होता. या पाचही व्यवहारात मिळून रुपया १३३ पैशांनी वधारला आहे. ३ डिसेंबरपासून त्यात वाढच नोंदली गेली आहे. भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा येत असल्याचे चित्र असतानाच परकी चलन व्यवहारातही आयातदार, बँक यांच्याकडून अमेरिकन चलनाचे व्यवहार वाढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2013 8:29 am

Web Title: indian rupee up 9 paise at four month high of 61 04 against us dollar
टॅग : Us Dollar
Next Stories
1 आता डोळे पाणावणार नाहीत!
2 म्युच्युअल फंड गंगाजळी विक्रमी ९ लाख कोटींच्या वेशीवर!
3 मोटरसायकलींना दिवाळीने तारले; प्रवासी कारपुढे मात्र अंधार कायम
Just Now!
X