अमेरिकी डॉलरपुढे शरणागती रुपयाला सोमवारी ७४ नजीक घेऊन गेली. डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपया १८ पैशांच्या घसरणीसह ७३. ९५ वर पोहोचला. याचे परिणाम शेअर बाजारावरही उमटले असून बाजार सुरू होताच सेन्सेक्स जवळपास ३०० अंशांनी घसरला.
अमेरिकी चलनासमोर रुपयाची हतबल घसरण सोमवारीही कायम आहे. सोमवारी डॉलरमागे रुपयाने ७३. ९५ चा तळ गाठला.
रुपयाच्या पडझडीचे परिणाम शेअर बाजावरही झाले. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ३०० अंशांनी घसरुन ३४, ०४८ वर पोहोचला. तर निफ्टी १०७ अंशांनी घसरुन १०२०९.५ वर पोहोचला. फार्मा, ऑटो आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या शेअर्सला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र, काही वेळात सेन्सेक्स सावरल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.
सोमवारी खनिज तेलाची किंमत प्रति पिंप ८३ डॉलर इतकी आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा परिणाम इंधनाच्या दरावर होईल. इंधन महागल्याच्या परिणाम सर्वदूर किंमतवाढीचा ठरेल आणि देशांतर्गत चलनवाढीलाही खतपाणी घातले जाईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 10:21 am