05 August 2020

News Flash

‘जागतिक ब्रॅण्ड्सच्या आव्हानानंतरही भारतात खेळणी उद्योगाला पारंपरिक बाज’

भारतातील ग्राहक किमतीबाबत खूपच दक्ष असल्याने स्थानिक पातळीवर बनविलेली पारंपरिक बाज असलेली

भारतातील ग्राहक किमतीबाबत खूपच दक्ष असल्याने स्थानिक पातळीवर बनविलेली पारंपरिक बाज असलेली व ग्राहकांना परवडणाऱ्या खेळण्यांनाच आजही बाजारात मोठी पसंती मिळत आहे, असे दी ऑल इंडिया टॉय मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (टैट्मा)चा कयास आहे. पण त्याच वेळी भारताच्या बाजारपेठेची विविधता अधोरेखित करणारी बाब म्हणजे विदेशातून येणाऱ्या ब्रॅण्डेड खेळणी व गेम्सनाही येथे मोठा वाव असल्याचे ‘टैट्मा’ने स्पष्ट केले आहे.
भारताच्या खेळण्यांच्या बाजारपेठेचा आवाका २,६५० कोटी रुपयांचा असून, तो २०१७ पर्यंत साधारण ३,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे ‘टैट्मा’चे अध्यक्ष विवेक झांगियानी यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेच्या उभारीसह मध्यमवर्गीय कुटुंबात नवनव्या खेळण्यांबद्दल मागणी व आकर्षण वाढत असले तरी स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या खेळण्यांचाच बाजारात वरचष्मा असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद व पुणे ही भारतीय खेळणी उद्योगाची महत्त्वाची केंद्रे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात येत्या २४ ते २६ सप्टेंबर असे तीन दिवस सुरू राहणाऱ्या स्पीलवेअरएनमेसे ईजीच्या तिसऱ्या ‘किड्स इंडिया २०१५’ या बी२बी धाटणीच्या खेळणी उद्योगाच्या व्यापार मेळ्याची माहिती झांगियानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिम्बा, डिकी, फनस्कूल, जॅस्को, पीकॉक टॉइज, विनेक्स, झफायर, फ्रँक एज्युकेशन एड्स वगैरे खेळणीविश्वातील ३५० हून अधिक देशी व जागतिक नाममुद्रांचा या मेळ्यात सहभाग असेल. यंदा ६,००० हून अधिक विक्रेते व वितरकांची प्रदर्शनाला भेट अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2015 6:11 am

Web Title: indian toy makers strongly grows in front of international brands competition
टॅग Business News
Next Stories
1 अफवांच्या गदारोळातही कॉसमॉस बँकेच्या ठेवीत ३५० कोटींनी वाढ
2 विकास दर ७.३ टक्क्य़ांपेक्षा अधिकच
3 गुंतवणूकदारांची सप्ताहारंभी नफेखोरी
Just Now!
X