18 December 2018

News Flash

बिटकॉइनचे भारतात प्रथमच मोबाइल अ‍ॅपद्वारे व्यवहार

१० आकडी मोबाइल क्रमांकाचा पिन म्हणून वापर करावा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोणत्याही नियामकाचे नियंत्रण नसलेल्या मात्र भरधाव मूल्यतेजी आणि मागणीने चर्चेत राहिलेल्या बिटकॉइन या आभासी चलनाचे आता भारतात प्रथमच मोबाइल अ‍ॅपद्वारे व्यवहार होणार आहेत.

प्लुटो एक्स्चेंजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी भारत वर्मा यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी नवी दिल्ली येथे केली. मोबाइल अ‍ॅपवर आधारित वॉलेटच्या माध्यमातून आभासी चलनाचे व्यवहार करता येतील; यासाठी १० आकडी मोबाइल क्रमांकाचा पिन म्हणून वापर करावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. याद्वारे बिटकॉइन या आभासी चलनाची खरेदी, विक्री तसेच या चलनाद्वारे काही निवडक आर्थिक व्यवहार करता येतील, असे वर्मा यांनी सांगितले. सध्या मोबाइलद्वारे व्यवहार करावयाचे झाल्यास संकेतस्थळाच्या माध्यमातून चार आकडी पिनचा उपयोग केला जातो. बिटकॉइन व्यवहारांसाठी गेल्या दोन वर्षांत भारतात १५ हून अधिक मंच तयार झाले आहेत. मात्र प्लुटोच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रथमच व्यवहार होऊ शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. चालू महिन्यात बिटकॉइनचे मूल्य १३,००० डॉलपर्यंत गेल्याने आभासी चलन विशेष चर्चेत आले. या आभासी चलनाबाबत सावधगिरी बाळगून व्यवहारकर्त्यांनी स्वत: जोखीम बाळगावी, असे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेनेही केले होते.

First Published on December 29, 2017 1:38 am

Web Title: indias first bitcoin trading app launched