चालू आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्के राहण्याचा अंदाज आहे. मागच्या आर्थिक वर्षात हा विकास दर ६.८ टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने हा अंदाज वर्तवला आहे.

आरबीआयने डिसेंबर महिन्यात जीडीपी ६.१ टक्क्यांऐवजी ५ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. उत्पादन क्षेत्रात प्रगतीचा वेग मोठया प्रमाणावर मंदावला आहे. २०१९-२० मध्ये उत्पादन क्षेत्राच्या विकासाचा वेग २ टक्के राहील. वर्षभरापूर्वी याच क्षेत्राचा विकासाचा वेग ६.९ टक्के होता.

जाहीर झालेले आकडे सरकारची चिंता वाढवणारे आहेत. कारण सर्वच क्षेत्रातून समोर येणारे आकडे समाधानकारक नसून, देशात मंदीसदृश्य स्थिती आहे. नवीन रोजगार निर्माण होत नसल्यामुळे बरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.