News Flash

देशातील चहा उत्पादन २०१३-१४ मध्ये ८% वाढून १२२.४५ कोटी किलोग्रॅमवर!

आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहामळ्यांमधून जोमदार पिकाच्या जोरावर देशातील चहा उत्पादन सरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांत आठ टक्क्यांनी वाढून १२२.४५ कोटी किलोग्रॅमवर पोहचले आहे.

| May 22, 2014 01:02 am

आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहामळ्यांमधून जोमदार पिकाच्या जोरावर देशातील चहा उत्पादन सरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांत आठ टक्क्यांनी वाढून १२२.४५ कोटी किलोग्रॅमवर पोहचले आहे. २०१२-१३ मध्ये देशातील चहा उत्पादन ११३.५० किलोग्रॅम होते.
भारतीय चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमधील उत्पादन आधीच्या वर्षांच्या तुलनेत यंदा ६.५२ टक्क्यांनी वाढून ९८.०१ कोटी किलोग्रॅम झाले. २०१२-१३ मध्ये ते ९२.०१ कोटी किलोग्रॅम होते. पश्चिम बंगालसह आसाम या दोन राज्यांतून देशातील ८० टक्के चहा उत्पादन येते. तर दक्षिणेकडच्या तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांचे योगदान १३ टक्के (२४.४५ कोटी किलोग्रॅम) असे आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा चहा उत्पादक देश असून, जगात चहाची सर्वाधिक मागणी असलेला देशही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:02 am

Web Title: indias tea output rises 8 to 1224 48 million kg in 2013 14
Next Stories
1 महिंद्रमध्ये तीन दिवस उत्पादन बंद
2 भारतीयांचा सोने-हव्यास संकोचला!
3 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची गरज नाही: राजन
Just Now!
X