ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन ६.६ टक्कय़ांनी वाढले आहे. मुख्यत्त्वे निर्मित वस्तू आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील कामगिरीमुळे यंदा एकूण औद्योगिक उत्पादन वाढ नोंदली गेली आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आकडेवारीनुसार, निर्मित वस्तू व वीजनिर्मिती क्षेत्रात अनुक्रमे ३.५ टक्के आणि ११.२ टक्कय़ांची वाढ नोंदली गेली आहे.
ऑक्टोबरमध्ये खाण क्षेत्रात मात्र १.५ टक्कय़ांची घसरण नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी – ऑक्टोबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ६.६ टक्कय़ांनी खाली आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:11 am