23 August 2019

News Flash

औद्योगिक उत्पादनाचा ४ महिन्यांतील नीचांक

निर्मिती आणि खनिकर्म क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे यंदाचा हा दर रोडावला आहे.

| August 10, 2019 03:33 am

नवी दिल्ली : दोन टक्के दर नोंदविणारा जूनमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक गेल्या चार महिन्यांच्या तळात विसावला आहे. निर्मिती आणि खनिकर्म क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे यंदाचा हा दर रोडावला आहे.

कारखानदारीची प्रगती वर्तविणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वर्षभरापूर्वी, जून २०१८ मध्ये ०.२ टक्के होता. तर यंदाच्या मार्च, एप्रिल व जूनमध्ये तो अनुक्रमे २.७, ४.३ व ४.६ टक्के राहिला आहे.

केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्यानुसार, एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादन ३.६ टक्के दराने वाढले आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५.१ टक्के दराच्या तुलनेत ते कमी आहे.

जून २०१९ मध्ये भांडवली वस्तू क्षेत्र ६.५ टक्क्य़ाने घसरले आहे. तर खनिकर्म १.६ टक्क्य़ांनी घसरले आहे. ऊर्जा निर्मिती क्षेत्राची वाढ ८.२ टक्के राहिली आहे. प्राथमिक वस्तू उत्पादन शून्याच्या काठावर आहे.

एकूण २३ पैकी ८ उद्योगांची कामगिरी सकारात्मक राहिली आहे.

First Published on August 10, 2019 3:33 am

Web Title: industrial production growth slows to 4 month low zws 70