सलग तिसऱ्या महिन्यात उणे स्थितीत राहताना देशाचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारी २०१६ मध्येही – १.५ टक्के या नकारात्मक स्तरावर राहिला आहे. निर्मिती आणि भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रातील सुमार प्रतिसादामुळे दराने अर्थव्यवस्थेवरील मंदी स्पष्ट केली आहे.
जानेवारी २०१५ पासून देशाचा औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबर २०१५ मध्ये सर्वाधिक ९.९ टक्क्य़ांवर होता. पुढील महिन्यातच त्यात मोठी आपटी नोंदविली जाताना हा दरही उणे (३.४%) स्थितीत आला. पुढे दोन महिने तो शून्याखालीच राहिला आहे. वार्षिक तुलनेत यंदाच्या जानेवारीत (-) १.५ टक्क्य़ांपर्यंत घसरला. तर एप्रिल ते जानेवारी या चालू आर्थिक वर्षांतील कालावधीत तो वर्षभरापूर्वीच्या २.७ टक्के या समान पातळीवर राहिला आहे. निर्मिती क्षेत्रातील २२ उद्योगांपैकी १० क्षेत्रात नकारात्मकतेचे दर्शन घडले आहे. औद्योगिक उत्पादन दरामध्ये गणली जाणारी निर्मिती प्रामुख्याने भांडवली वस्तू उत्पादनातील तब्बल २०.४ टक्क्य़ांच्या घसरणीमुळे यंदा विस्तारली आहे.