News Flash

राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक संकेतस्थळ

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल.

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे संकेतस्थळ निश्चिातच उपयोगी ठरेल, असा विश्वाास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्व्यक्त केला.

नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाइन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

उद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्नात महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्वाचे साधन आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढताना या निर्देशांकाचा उपयोग होतो. या निर्देशांकाचा उपयोग करून आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू तसेच राबवू शकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या धोरणांचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच, उद्योग आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:37 am

Web Title: industrial production index website to accelerate the state economic cycle abn 97
Next Stories
1 टाटा समूहाची ‘बिगबास्केट’वर मालकी
2 अन्नधान्य, इंधन महागाईचा लवकरच भडका
3 आंतरराष्ट्रीय आस्थापनांचाही भारताला सहकार्यओघ
Just Now!
X