देशातील औद्योगिक उत्पादन रुळावर असल्याची प्रचिती नोव्हेंबरमधील आकडेवारीने दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीचा औद्योगिक उत्पादन दर ३.८ टक्के असा गेल्या पाच महिन्यातील वरच्या टप्प्यावरचा आहे. निर्मिती क्षेत्र, खनिकर्म भांडवली वस्तू क्षेत्रातील वाढत्या हालचालींचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकासाठी गृहित धरले जाणारी औद्योगिक निर्मिती वर्षभरापूर्वी याच कालावधीत काहीशी रोडावली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये हा दर १.३ टक्के होता. तर चालू आर्थिक वर्षांतील आतापर्यंतचा दरही काहीसा वधारला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ दरम्यान औद्योगिक उत्पादन वार्षिक तुलनेत ०.१ टक्क्य़ावरून २.२ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. निर्देशांकात ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राने यंदाच्या नोव्हेंबरमध्ये २.६ टक्क्य़ांवरून ३ टक्के प्रगती केली आहे.