13 December 2019

News Flash

महागाई दराची जुलैमध्ये उसंत; निर्देशांकात ‘किरकोळ’ घसरण

महागाई दर सध्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षित ४ टक्क्यांच्या आत आहे.

| August 14, 2019 03:41 am

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती काही प्रमाणात वाढूनही जुलैमधील किरकोळ महागाई दर काहीसा कमी झाला आहे. गेल्या महिन्यातील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.१५ टक्के नोंदला गेला आहे.

यंदाचा महागाई दर हा गेल्या सहा महिन्यांत प्रथमच कमी झाला आहे. आधीच्या महिन्यात, जूनमध्ये किरकोळ महागाई दर ३.१८ टक्के, तर वर्षभरापूर्वी, जुलै २०१८ मध्ये तो ४.१७ टक्के होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जुलैमध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकातील अन्नधान्याचा महागाई दर २.३६ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यातील २.२५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा तो काही प्रमाणात वाढला आहे.

महागाई दर सध्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षित ४ टक्क्यांच्या आत आहे. कमी महागाई दरामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा सलग चौथ्या द्विमासिक पतधोरणात व्याजदर कपात केली. यंदाची कपात मोठी होती.

First Published on August 14, 2019 3:41 am

Web Title: inflation rate rises in july zws 70
Just Now!
X