News Flash

महागाई ६ टक्क्यांवर

जूनमध्ये दर ४ टक्के रिझव्‍‌र्हच्या बँक क्षमतेपार

संग्रहित छायाचित्र

 

करोना आणि टाळेबंदीचा अपेक्षित परिणाम देशातील महागाईवर झाला असून गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के अपेक्षित किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित जूनमधील महागाई दर ६.०९ टक्के  नोंदला गेला आहे.

कंद्र सरकारने दोन महिन्यांनंतर महागाईबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यापूर्वी, मार्चमधील किरकोळ ग्राहक किं मत निर्देशांकावर आधारित महागाई दर ६ टक्क्यांच्या काठावर, ५.८४ टक्के  होता. केंद्र सरकारने शिथिलीकरणाचा दुसरा टप्पा लागू केला असला तरी अनेक भागांत स्थानिक प्रशासनाद्वारे कठोर टाळेबंदीचा विस्तार करण्यात आल्याने महागाईचा दर वाढल्याचे निरीक्षण केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नोंदविले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी देशातील अर्थस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. अर्थव्यवस्थेत पुन्हा मागणी येण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने कोविड-१९ संकट उद्भवल्यापासून, फेब्रुवारी २०२० पासून रेपो दरात आतापर्यंत १.३५ टक्के दर कपात केली आहे. परिणामी अनेक बँकांनी त्यांचे कर्जाचे तसेच ठेवींचे दरही किमान पातळीवर आणून ठेवले आहेत.

अन्नधान्यात दिलासा

एकू ण किरकोळ महागाई दर गेल्या महिन्यात वाढला असला तरी प्रमुख अन्नधान्याच्या दरांमध्ये दिलासा आहे. जूनमधील अन्नधान्याचा महागाई दर ७.७८ टक्के  नोंदला गेला आहे. तो गेल्या नऊ महिन्यांतील किमान स्तरावर स्थिरावला आहे. अन्नधान्याच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीत होत असल्याने हा दर कमी झाल्याचे मानले जाते. आधीच्या, मे महिन्यात हा दर थेट ९.२ टक्के होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:16 am

Web Title: inflation rises to 6 per cent abn 97
Next Stories
1 भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे- दास
2 “करोना हे आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील शतकातील सर्वात वाईट संकट”
3 निर्देशांक माघारी
Just Now!
X